Nashik

नाशिक विमानतळावर नोकरी देण्याच्या आमिषाने युवकाची ऑनलाईन अर्थिक फसवणूक

नाशिक विमानतळावर नोकरी देण्याच्या आमिषाने युवकाची ऑनलाईन अर्थिक फसवणूक

सुनील घुमरे

सध्या ऑनलाईन फसवणुकीचे प्रकार वाढत चालले असून सुशिक्षित बेरोजगारांना नोकरीचे आमिष दाखवून आर्थिक लुबाडणूक करण्याचे प्रकार वाढत आहे. यातच नाशिक विमानतळात ऑफिशियल कामासाठी भरती म्हणून एका सुशिक्षित बेरोजगारांची फसवणूक झाल्याचा प्रकार नुकताच उघड झाला. नाशिक येथील पाथर्डी फाटा येथील भानाजी गुळवे या युवकाला स्पाइसजेट कंपनीकडून नाशिक विमानतळावर ऑफिशियल भरती असल्याची माहिती एका वेबसाईटवर मिळाली. तेथे दिलेल्या मोबाईल नंबरवर संपर्क साधत फ्लायस्केअर सोलुशन कंपनीच्या मेल आयडीवर १७ जून २०२० ला बायोडाटा मागितला. त्यानंतर १८ जूनला ऑफर लेटर दिले. तसेच १९ जूनला रेफरन्स आयडी दिला व जोईनिंग बॉन्ड लिहून घेतला. पुन्हा १३ जुलैला ऑफर लेटर आले व १५ सप्टेंबरला ट्रेनिंग लेटर देण्यात आले. या दरम्यान १७ जून रोजी दोन हजार पाचशे रुपये, १९ जून रोजी पासपोर्टसाठी पंधरा हजार, २६ जून रोजी दहा हजार व पुन्हा दोन हजार रुपये, आणि २८ जून रोजी वीस हजार असे एकूण ३७ हजार पाचशे रुपये आयडीबीआय बँकेतील सचिन कुमार या ईसममाच्या नावे असलेल्या खात्यावर जमा करण्यात आले.

मागणीनुसार बँकेत पैसे टाकत गेला. त्यानंतर १५ सप्टेंबर रोजी ट्रेनिंग लेटर आल्यावर तो नाशिक विमानतळावर रुजू होण्यासाठी आला परंतु तेथे आल्यावर उपस्थित कर्मचाऱ्यांनी त्याला ते फेक असल्याचे लक्षात आणून दिले यावेळी आपली फसवणूक झाली असल्याचे त्याच्या लक्षात आले‌.४४ हजार पाचशे रूपये महिना पगार असलेल्या नोकरीच्या आमिषाने लुबाडणूक झाल्याने युवक भानाजी गुळवे याची मोठी निराशा झाली. याची सविस्तर चौकशी केली असता असे अनेक बेरोजगार युवक येथे ऑनलाइन फसवणूक होऊन येत असतात असे लक्षात आले वारंवार नोकरीचे आमिष दाखवून बेरोजगार युवकांचे आर्थिक लूट होत असल्याचे निष्पन्न होते. ऑनलाइन पद्धतीने येथे कोणतीही भरती होत नसून येथे स्पायजेट नावाची कंपनीच अस्तित्वात नसल्याचे सांगण्यात आले. अशा ऑनलाईन पद्धतीने बेरोजगारांना गंडा घालणाऱ्या टोळीचा पर्दाफाश होऊन यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावे अशी मागणी होत आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button