Ratnagiri

सुशिलकुमार पावरा यांना आंतरराष्ट्रीय मूर्ती पुरस्कार जाहीर…

सुशिलकुमार पावरा यांना आंतरराष्ट्रीय मूर्ती पुरस्कार जाहीर…

रत्नागिरी : निर्वाण फाऊंडेशन नाशिक, महाराष्ट्र आयोजित आंतरराष्ट्रीय मूर्ती पुरस्कार समाजसेवा क्षेत्रात समाजसेवक सुशीलकुमार पावरा यांना जाहीर करण्यात आला आहे. निलेश यशवंत आंबेडकर अध्यक्ष, निर्वाण फाऊंडेशन नाशिक महाराष्ट्र यांनी पुरस्कार निवड पत्र पुरस्कार विजेते सुशीलकुमार पावरा यांना दिले आहे. या स्पर्धेत देशभरातील लाखो स्पर्धकांनी भाग घेतला होता. सुशीलकुमार पावरा यांचे उशीराने नोंदणी केली होती. तरीही social service समाजसेवा या क्षेत्रात सुशीलकुमार पावरा यांनी प्रेक्षकांनी सर्वाधिक like पसंत केले. आयोजकांनी पावरा यांचे अभिनंदन केले आहे. कोवीड 19 चा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन पुरस्कारासाठी कार्यक्रमाचे ठिकाण,तारीख कळवली जाईल. असे पञात म्हटले आहे. सुशीलकुमार पावरा यांची 129 वेळा उपोषण करणारे उपोषण कर्ता, शिक्षक, गायक ,नृत्यक,कराटेमॅन, कोकण विभाग प्रमुख आणि अध्यक्ष बिरसा क्रांती दल म्हणूनही विशेष ओळख आहे. सध्या सोशल मिडीयावर सुशीलकुमार पावरा यांच्या कामाला अधिक पसंती दर्शवली जात आहे. आदिवासी समाजाच्या वाॅटसप ग्रूपवर , फेजबूक पेज वर सुशीलकुमार पावरा यांना प्रेषक सर्वाधिक पसंत करतात. सुशीलकुमार पावरा यांनी टिक टाॅक -Tik tok वरही आपल्या गायकी व नृत्याने प्रेक्षकांवर छाप पाडली होती. टिक टाक स्टार म्हणून ही त्यांना लोक ओळखू लागले होते.
सुशीलकुमार पावरा यांनी समाजसेवा (social service ) यांनाही क्षेत्रात पुरस्कारासाठी 2 दिवसांपूर्वी नामांकन दाखल केले होते.फक्त एकाच दिवसात सुशीलकुमार पावरा यांना प्रेक्षकांकडून सर्वाधिक लाईक- पसंती मिळाली व बायोडाटातील कामाची पसंतीवरून त्यांचा पुरस्कार निश्चीत करण्यात आला आहे. कला, क्रीडा,संगीत, गायन, वादन, नृत्य, शिक्षण, समाजसेवा इत्यादी विविध श्रेञासाठी निर्वाण फाऊंडेशन नाशिक महाराष्ट्र आंतरराष्ट्रीय मूर्ती पुरस्कार 2021 आयोजित केला होता.
ब्लॅक लेडी अवार्ड/ पदक/ विशेष प्रमाणपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप असून राष्ट्रीय प्रतिष्ठीत व्यक्तीकडून हा पुरस्कार देऊन सुशीलकुमार पावरा यांचा सन्मान करण्यात येणार आहे. सुशीलकुमार पावरा यांना हा पुरस्कार निश्चीत झाल्याबद्धल आदिवासी बांधव व इतर सर्वच क्षेत्रातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. सुशीलकुमार पावरा यांनी त्यांच्या पुरस्कारासाठी लाईक करणा-या सर्व मित्रांचे जाहीर आभार मानले आहेत.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button