मराठा समाज मंडळ यांच्या वतीने राजमाता जिजाऊ जयंती व संक्रांती निमित्त हळदी कुंकू
दिलीप वाघमारे
लोणंद शहरांमध्ये मराठा समाज मंडळ यांच्या वतीने राजमाता जिजाऊ जयंती व संक्रांती निमित्त हळदी कुंकू वाण लुटण्याचा कार्यक्रम व होम मिनिस्टर 19 जानेवारी अतुल मंगल कार्यालय लोणंद मध्ये अभिनेत्री मेघना झुझम यांच्या शुभारंभ शुभ हस्ते झाला प्रथम दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.
नंतर महिलांनी हळदीकुंकू एकमेकास लावून करण्यात आला होम मिनिस्टर मध्ये सहभागी होऊन आनंदाचं नावून निघाल्या या कार्यक्रमासाठी शैलजा खरात नगरसेविका सुभाष घाडगे नगरसेवक हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते कार्यक्रमासाठी महिलावर्ग बहुसंख्येने नटून-थटून सांस्कृतिक कार्यक्रमास सहभागी होऊन लोणंद कराला आगळावेगळा कार्यक्रम पहावयास मिळाला पंचक्रोशीतील व शहरातील महिला भगिनी मुली कार्यक्रम पाहण्यासाठी सकाळपासूनच गर्दी केली होती हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मंडळाचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते






