पातोंडा लिपिक भरती पारदर्शकपणे घेण्याची स्पर्धा परीक्षार्थी तरुणांची मागणी… ग्रामविकास अधिकारी यांना दिले निवेदन…
रजनीकांत पाटील
पातोंडा ता अमळनेर :- येथील लिपिक भरतीचे प्रकरण जिल्हाभर गाजत होते. दिनांक १४ फेब्रुवारी २०२० रोजी सदर भरतीची जाहिरात निघाली होती. त्यानुसार उमेदवारांनी रीतसर अर्ज केले होते. त्यातील काही अर्ज बाद करण्यात आले होते. जाहिरात नियम प्रकिया नुसार भरती होणे अपेक्षित असताना काही ग्रा.पं. सदस्यांनी संगनमताने धनशक्तीच्या जोरावर बहुमताचा घाट घालून भरती प्रकिया बाध्य करण्याच्या प्रयत्न केला. त्यामुळे शैक्षणिक अहर्ता,मेरिट,मार्क्स गुणवत्तेनुसार पहिल्या क्रमांकावर असलेल्या कु.राकेश विलास पाटील या उमेदवाराला डावलून जाहिरात नियमानुसार पहिल्या क्रमांकावर असलेल्या उमेदवाराची निवड अपेक्षित असताना तिसऱ्या क्रमांकावर असलेल्या अक्षय नेहरू पवार या उमेदवाराची निवड करण्यात आली. हे करत असताना इतर पाच उमेदवारांचा सुद्धा विचार केला गेला नाही.
मासिक सभेचे कामकाज सुरू असताना गावकऱ्यांनी प्रचंड संख्येने एकत्र येत विरोध दर्शविला होता. या वेळी लॉकडाऊनचे उल्लंघन होत असताना देखील ग्रा.पं.प्रशासन बघ्याची भूमिका घेत होते. यावेळी अन्य विषयांवर सुद्धा चर्चा झाली नाही. तेव्हा इतर ६ ही उमेदवारांनी सीईओ,जळगाव आणि गटविकास अधिकारी सो,अमळनेर यांच्याकडे रीतसर तक्रार केली होती. ह्या काळात प्रकरण प्रलंबित असताना सरपंचांनी ग्रामसेवकाच्या साथीने परस्पर ऑर्डर दिली होती. तेव्हा या मध्ये मोठ्या प्रमाणावर पैशाचा व्यवहार झाल्याचे गावात बोलले जात होते. तेव्हा दि.५ ऑगस्ट रोजी बीडीओ यांचे कार्यालय, अमळनेर येथे तक्रारदार आणि सरपंच व ग्रामसेवक यांच्या उपस्थितीत सुनावणी घेण्यात आली. त्यानुसार ११ ऑगस्ट रोजी गटविकास अधिकारी यांनी लेखी आदेश देऊन भरती रद्द करून सदर भरती सामान्य प्रशासन विभाग, शासन निर्णय क्र. प्रानिम 1215 प्रक्र 109/15/13-अ, दि.05 ऑक्टोबर 2015 रोजीच्या नियमास अनुसरून नव्याने घेण्याचे लेखी आदेश दिले आहेत. त्यामुळे गावकऱ्यांनी प्रशासनाचे आभार मानले आहेत. सदर उमेदवाराची निवड रद्द करून भरती रद्द झाल्याने परंपरागत राजकारणाला शह बसून बहुमताचा डाव खेळणाऱ्या 9 सदस्यांना आणि त्यांना साथ देऊन धनशक्तीच्या जोरावर संगनमताने मनमानी कारभार करू पाहणाऱ्या सरपंच व ग्रामसेवकाला चाप बसला आहे. सदर भरती नव्याने घेऊन स्पर्धा परीक्षेच्या अभ्यास करणाऱ्या गावातील सगळ्या तरुणांना संधी देऊन शासन निर्णयानुसार लेखी परिक्षाद्वारे पारदर्शकपणे भरती घेऊन गावासाठी योग्य उमेदवाराची निवड करण्यात यावी. आणि सदर आदेशाची अंमलबजावणी करून लेखी पत्रक काढावे. या मागणीसाठी आज स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या गावातील मंगेश मोरे, अक्षय मोरे, दीपक कुंभार, सतीश बिरारी, विनोद मोरे या तरुणांनी सरपंच, उपसरपंच यांच्यासहित ग्रामसेवकांना निवेदन दिले. सदर निवेदनावर राम लाड,दीपक पवार, गौरव बिरारी, पंकज बिरारी,भूषण बिरारी,कल्पेश बिरारी,विक्की पारधी,गणेश सोनवणे,सचिन पारधी,समाधान वाघ,प्रशांत वाडीले,प्रशांत सोनवणे, स्वप्नील सोनवणे, आकाश शिंदे, सुमित बाविस्कर, पवन बिरारी, यदनेश पाटील, चेतन भदाणे, राहुल पाटील, गणेश कुंभार, आनंद कुंभार, रोहित पवार, संदीप पवार इत्यादींच्या सह्या होत्या.
पातोंडा लिपिक भरती नव्याने घेताना शासन नियमानुसार जाहिरात प्रकिया पार पाडून लेखी परीक्षेद्वारे गुणवत्तापूर्ण उमेदवाराची निवड करण्यात यावी.जेणेकरून गावकऱ्यांना योग्य कामासाठी योग्य उमेदवार मिळेल.आणि गोरगरिबांच्या मुलांना प्रशासकिय नोकरी मध्ये संधी मिळेल.
:-सतीश बिरारी(स्पर्धा परीक्षार्थी)






