खासदार श्रीरंग बारणे यांना मावळ तालुक्यातील प्रश्नाबाबत निवेदन – बिरसा क्रांती दल..
पुणे – प्रतिनीधी दिलीप आंबवणे
मावळचे खासदार श्रीरंग बारणे यांना बिरसा क्रांती दल मावळ तालुकाच्या वतीने विविध समस्यांबाबत भेटून निवेदन देण्यात आले.
त्यावेळी कर्जत तालुक्यातून आदर मावळ भागातून खेड ला जाणारा मार्गाचे काम अनेक दिवसापासून रखडलेले आहे. रस्ताचे काम लवकर लवकर पुर्ण केले तर भिमाशंकर येथे जाण्यायेण्यासाठी सोईचे होईल. त्यामुळे मावळ तालुक्यातील भीमाशंकर जोड रस्ता काम सुरू करणे, आद्रा धरण बाधल्याने आदर मावळ या भागात जाण्यासाठी नागरिकांची गैरसोय होत आहे. रस्तावर पाणी येत असल्याने वाहतूक बंद असते. वडेश्वर किवळेफाटा रस्तावर पुल बांधणे, मावळ तालुक्यात मोठ्या प्रमाणावर आदिवासी लोकसंख्या असून त्यासाठी आदिवासी सांस्कृतीक भवन बांधणे.
त्यावेळी बिरसा क्रांती दल जिल्हा उपाध्यक्ष मारूती खामकर, जिल्हा संघटक विक्रम हेमाडे, तालुका अध्यक्ष अंकुश चिमटे, महासचिव उमाकांत मदगे, उपाध्यक्ष कांताराम असवले, लहु दगडे, सल्लागार माजी सभापती शंकर सुपे, बजरंग लोहकरे, शंकर हेमाडे, अनिल कोकाटे, सुरेश कशाळे, बाळू पावशे, प्रसिध्दी प्रमुख मधुकर कोकाटे, दशरथ आढारी, विजय लांघी, संतोष हिले, दिपक कोकाटे, रामदास मदगे, शैलेश हेमाडे आदी नागरिक उपस्तित होते.






