Mumbai

? शिवसेनेने काजूरमार्ग मेट्रो कारशेडजवळ जागा बाळकवण्याऱ्याचा डाव उधळला! मोफत घराच्या नावाखालीभूमाफियाची सुरू होती दलाली..!

? शिवसेनेने काजूरमार्ग मेट्रो कारशेडजवळ जागा बाळकवण्याऱ्याचा डाव उधळला! मोफत घराच्या नावाखालीभूमाफियाची सुरू होती दलाली..!

मुंबई : कांजुरमार्ग येथे मेट्रो कारशेडचे काम सुरू झाल्याचा फायदा घेऊन या ठिकाणी घर मिळवून देतो असे सांगत भूमाफियांनी सुरू केलेली दलाली शिवसेनेने दणका देत उधळून लावली. शिवसेना आमदार सुनील राऊत यांनी या ठिकाणी पोलीस आणि पालिका प्रशासनासह धडक देत कारवाई करण्यास भाग पाडले. या ठिकाणी जागा अडवण्यासाठी बेकायदेशीरपणे बांबू, दोऱया आणि प्लॅस्टिकचा वापर करून बांधलेल्या झोपडय़ा रविवारी जमीनदोस्त करण्यात आल्या.

कांजुरमार्ग येथे मेट्रो कारशेडचे काम सुरू झाल्यापासून या परिसरात गुंड आणि भूमाफियांनी दलाली सुरू केली आहे. विक्रोळी पूर्व येथील बिंदुमाधव ठाकरे रोडलगत राज्य शासनाच्या जागेवर (कलेक्टर लँड, म्हाडा, वन खात्याची जागा) दलालांनी गरीब, बेघरांना पुढे करून झोपडय़ा बांधण्यास सुरुवात केली आहे.
या भूमाफियांनी बेघरांना मोफत घरे बांधून देतो असे सांगत त्यांच्याकडून आधारकार्ड, रेशनिंग कार्डची प्रत घ्यायला सुरुवात केली. याची माहिती मिळताच मोफत घर मिळवण्यासाठी मुंब्रा, धारावी, दिवा, चेंबूर, कुर्ला, गोवंडी, शिवाजीनगर, भांडुप या ठिकाणच्या हजारो नागरिकांची एकच झुंबड उडाली.

हा गंभीर प्रकार समोर येताच शिवसेना आमदार सुनील राऊत यांनी विक्रोळी पोलीस ठाण्याचे डीसीपी प्रशांत कदम यांच्यासह पालिका उपायुक्त क्षीरसागर आणि वॉर्ड ऑफिसर आचरेकर यांच्याशी संपर्क साधून घटनास्थळी धाव घेतली. भूमाफियांचा डाव यावेळी पालिका आणि पोलिसांच्या निदर्शनास आणून दिला. याची दखल घेत पोलीस आणि पालिकेकडून तातडीने तोडक कारवाई करण्यात आली.

फसव्या योजनांना बळी पडून नका!

कांजुरमार्ग येथे मेट्रो कारशेडचे काम सुरू झाल्यापासून या ठिकाणी मोठय़ा प्रमाणात भूमाफिया आणि गुडांनी ठाण मांडले आहे. गोरगरीब आणि बेघरांना या ठिकाणी घर मिळवून देतो असे सांगून जागा बळकावण्याचे प्रकार सुरू असल्याचे आमदार सुनील राऊत यांनी सांगितले.

मात्र अशा भूलथापांना गोरगरीबांनी बळी पडू नये, असे आवाहनही आमदार राऊत यांनी केले आहे. अशा प्रकारच्या बेकायदेशीर बांधकामांना कोणत्याही प्रकारची भरपाई मिळत नाही. त्यामुळे या परिसरात अशी अनधिकृत बांधकामे उभारली जाऊ नयेत यासाठी प्रशासनाकडून विशेष लक्ष ठेवले जाणार असून बेकायदेशीर बांधकांवर कारवाई केली जाणार असल्याचेही आमदार राऊत यांनी सांगितले.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button