India

आरोग्याचा मुलमंत्र..माहिती थायरॉईड ची काळजी शरीराची

आरोग्याचा मुलमंत्र..माहिती थायरॉईड ची काळजी शरीराची

थायरॉइड हा एक हार्मोन्सशी निगडीत आजार आहे. थायरॉइडच्या ग्रंथी आपल्या मेटाबॉलिज्म कंट्रोल करतात. आपलं मेटाबॉलिज्म स्लो काम करेल की सामान्यपणे कार्य करेल हे थायरॉइड हार्मोन्सवर अवलंबून असतं. आपल्या गळ्याच्या समोरच्या भागात ज्या ग्रंथी असतात त्यांना थायरॉइड म्हटलं जातं. यातून एक प्रकारचे हार्मोन्स निघतात ज्यांना थायरॉइड हार्मोन म्हटलं जातं. या हार्मोनमुळे आपल्या शरीराच्या अवयवांच्या क्रिया नियंत्रित होतात. हा आजार मुख्यत्वे आयोडीनच्या कमतरतेमुळे होतो. यासोबतच शरीरातील पोषक तत्वांचा अभाव जसं की झिंक, सेलेनियम, फॉस्फरस आणि व्हिटॅमिन्सच्या कमतरतेमुळे या आजाराचा धोका वाढतो. काही प्रकरणांमध्ये आनुवंशिकता देखील याला जबाबदार असू शकते.

थायरॉइडचे दोन प्रकार असतात
१) हायपोथायरॉडीजम :-
पहिला प्रकार तो असतो ज्यामध्ये थायरॉइड ग्रंथींद्वारे हार्मोन्सचे उत्पादन कमी होते आणि या स्थितीला हायपोथायरॉइडिज्म असं म्हटलं जातं.

२) हायपर थायरॉइडिज्म
या प्रकारात थायरॉइड ग्रंथींद्वारे होणारे हार्मोन्सचे उत्पादन गरजेपेक्षा अधिक असते. पण या दोन प्रकारातील हायपोथायरॉइडिज्मच्या रुग्णांचीच संख्या जास्त असते.

घ्यायची काळजी

कायम जेवणात आयोडीनयुक्त मीठाचा वापर केला पाहिजे. आयोडीन शरीरातील हार्मोन्सची पातळी संतुलित ठेवण्यास आणि रक्तप्रवाह सुरुळीत ठेवण्याचं काम करतं. यामुळे शारीरिक व मानसिक थकवा दूर होतो. आयोडीनचं नियमित सेवन केल्यास थायरॉइडवर नियंत्रण मिळवणं अधिक सोपं जातं.

झिंक व सेलेनियमयुक्त पदार्थ थायरॉइडची समस्या नियंत्रित करतात. याची पूर्तता करण्यासाठी तुम्ही दही, हंगामी फळे आणि भाज्यांचे सेवन आवर्जून करा. तसेच तुम्ही आपल्या आहारात अंडी, पूर्ण धान्य, डाळी, राजमा, काबुली चणा, हरभरा, अळशीच्या बिया यासारख्या पदार्थांचा समावेश केला पाहिजे.

जे लोक आधीपासूनच थायरॉइडने ग्रासित आहेत आणि औषधं घेत आहेत त्यांनी खाली दिलेल्या डायटची पूर्ण काळजी घेतली पाहिजे. सोया बेस्ड फुड, कॅल्शियम सप्लिमेंट किंवा अॅंटासिड यांचं सेवन औषधांनंतर लगेचच करु नये.

थायरॉइडच्या औषधांचे सेवन सकाळी सकाळी व काहीही न खाता केले जाते. सोया बेस्ड फुड, कॅल्शियम सप्लिमेंट किंवा अॅंटासिड या औषधांचं सेवन ३ ते ४ तासांनी करावं. कारण हे तीन घटक थायरॉइडच्या औषधांच्या कार्यात बाधा आणतात.

• थायरॉ केयर (thyrocare) नावाने मिळणारे औषध सुद्धा गुणकारी असल्याचे दिसून आले आहे.

• शक्य होईल तेवढ्या जास्त प्रमाणात प्रोटीन युक्त पदार्थ सेवन करा. जेणेकरून थायरॉईड ग्रंथी नियंत्रणात राहील

डॉ किशोर बाळासाहेब झुटे पाटील
( होमिओपॅथिक तज्ञ )

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button