शिरूड ते इंदवा बसप्रवास शालेय विद्यार्थीनिंना होतोय त्रास.. प्रवास ठरतोय डोकेदुखी
प्रवासात टवाळखोर ,प्रेम आणि रोड रोमियो चा उपद्रव…
रजनीकांत पाटील
अमळनेर: काही दिवसांनपुर्वीच इंधवा मार्गे पारोळा याच बसने प्रवास करणाऱ्या तीन टावळखोरांना चोप देण्यात आला असून त्यांना समज देऊन सोडण्यात आले होते मात्र आजून दुसरे टावळखोरांच्या संख्येत वाढ झाल्याचे दिसून येत आहे शिरूड,कावपिंप्री,इंधवा, बहादरपूर मार्ग पारोळा तर दुसरी बससेवा शिरूड,कावपिंप्री, इंदवा,पिंपळकोठा, भोलाने मार्गे मुकटी या बस म्हदे काही नेहमी प्रवास करणारे प्रेम रोमिओ तर काही टवाळखोरांच्या प्रमानात वाढ झाली आहे ही जास्ती प्रमाणात टवाळखोर पना करतांना आढळत आहे हे टवाळखोर मुले बस मध्ये गाणे वाजणे,मुलींना बघून जोराने किंचाळी मारणे या बाबत प्रकार घडत आहे असाच एक प्रकार पुन्हा आज इंधवा मार्गे शिरूड बस म्हदे घडला काही टवाळखोर मुले बसमध्ये मोगे उभी राहून गाणे वाजत किंचाळी मारत होती तर काहीं शिरूड बस स्टॉप वरून चढलेल्या तरुणींनी गाणे बंद करा असे सांगितले असता त्यांच्यात शाब्दिक चकमक झाली व याचे रूपांतर बस बस्थांकात पोहोचल्यावर व भांडणात झाले व भांडण बऱ्याच वेळ चालले असून नंतर काही मुलींचे पालक व काही वरिष्ठ आले व मिटवण्यात आले या बाबत शालेय विद्यार्थींनिमध्ये नाराजी व्यक्त होत आहे
या कडे पोलीस प्रशासनाने लक्ष देण्याची गरज आहे असे शालेय विद्यार्थी व वरिष्ठांना कडून म्हणने आहे.






