पंढरपूर प्रतिनिधी रफिक अतार
बार्शी बायपास रोडवर घडली आहे. यानंतर संतप्त जमावानं सावंत यांच्या गाडीची तोडफोड केली. अपघातात एका व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला. बार्शी शहरातील बायपास रोडवर BlT कॉलेज हा अपघात झाला.
अपघातावेळी तानाजी सावंत गाडीमध्ये नव्हते, अशी माहिती मिळत आहे.
अपघातातील ही गाडी तानाजी सावंत यांच्या नावावर नोंदणीकृत आहे. तानाजी सावंत यांचे पुतणे ऋतुराज सावंत प्रवास करत असलेल्या टोयोटा कारनं दुचाकीला धडक दिली. बार्शी-लातूर बायपास रोडवरील बीआयटी महाविद्यालयाजवळ असलेल्या शेलगाव फाटयाजवळ हा अपघात झाला. यामध्ये दुचाकीवरील शामकुमार देविदास व्हळे (वय 40 वर्ष) यांचा जागीच मृत्यू झाला. ते शेळगावचे रहिवासी होते. यानंतर संतप्त जमावानं सावंत यांच्या गाडीची तोडफोड केली.





