Lonand

लोणंद शहरातील प्रलंबित पिण्याच्या पाण्याची टाकी उभारणीसाठी शोले स्टाईलने आंदोलने करणेचा दिला इशारा

लोणंद शहरातील प्रलंबित पिण्याच्या पाण्याची टाकी उभारणीसाठी शोले स्टाईलने आंदोलने करणेचा दिला इशारा

दिलीप वाघमारे

लोणंद शहराला पुर्वी अनेक वर्षांपासून पाणी पुरवठा करणाऱ्या नगरपंचायत लगत असलेली पाण्याची टाकी पाणी साठवणूक क्षमता कमकुवत झाल्याने धोकादायक स्थिती उभी होती मागील वर्षी ती प्रशासकीय पातळीवर जमीनदोस्त करण्यात आली. संबंधित पाण्याची टाकी नव्याने उभारण्यासाठी उद्घाटने झाली तरी सदर पाण्याची टाकी उभारणी बाबत दिरंगाई का होत आहे याबाबत उलगडा होत नसुन याकारणे शहरातील इतर पाणी साठवणूक टाक्यांवर याचा अधिभार पडत असल्याने शहराला एक अथवा दोन दिवसाआड (आठवड्यातून दोनदा /तिनदा ) अवेळी व अपुर्ण पाणी पुरवठा होत आहे.

रहिवासी नागरिकांकडून पाणीपट्टी पुर्ण वार्षिक आकारणी करण्यात येते तर मंग कर भरुन सुद्धा शहरातील पाणीपुरवठा एक अथवा दोन दिवस आड (आठवड्यातून दोनदा/तिनदा ) का…? हि टंचाई निवारण करण्यासाठी शासन दप्तरी दिरंगाई का…? असा प्रश्न आम्हा सर्व सामान्य नागरिकांना पडला आहे.

लोणंद नगरित किमान रोज वेळेत व योग्य कालावधीसाठी पाणी मिळावे अशी अनेक नागरिकांची अपेक्षा आहे, शहरातील वाढती लोकसंख्या, नगरे, वस्त्या विचारात घेऊन योग्य, सक्षम व क्षमतेच्या पाण्याची टाकी उभारणी होणे आवश्यक आहे या जिवनावश्यक मुलभूत सुविधांसाठी लवकरात लवकर प्रलंबित असलेल्या या पाणी पुरवठा टाकीची उभारणी बाबत ठोस निर्णय घेऊन कामकाज सुरू झाले नाही तर आम्हाला नाईलाजाने शहरातील इतर पाणी साठवणूक टाक्यांवर चढुन शोले स्टाईलने आंदोलने करावी लागतील अशा इशारा साथ प्रतिष्ठानचे अध्यक्ष कय्युम मुल्ला यांनी लोणंद नगरपंचायत चे मुख्याधिकारी प्रसाद काटकर यांना दिला आहे. यावेळी समवेत साथ प्रतिष्ठानचे कायदेशीर सल्लागार अॅड. विलायत उर्फ बबलूभाई मणेर उपस्थित होते.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button