Yawal

यावल तालुक्यात आज तीन कोरानाबाधित रूग्ण आढळले ; पहा कोणत्या गावात किती रुग्ण?

यावल तालुक्यात आज तीन कोरानाबाधित रूग्ण आढळले ; पहा कोणत्या गावात किती रुग्ण?

रजनीकांत पाटील

यावल प्रतिनिधी >> यावल कोवीड केअर सेंटरने संशयित कोरानाबाधितांचे स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आले होते, त्यातील तीन जणांचा कोरोना अहवाल पॉझिटीव्ह आला आहे. तालुक्यात एकुण कोरोनाबाधितांचा आकडा ५५ वर पोहचला आहे. या वृत्ताला प्रभारी तालुका वैद्यकिय अधिकारी मनिषा महाजन यांनी दुजोरा दिला आहे.

संपुर्ण तालुक्यात कोरोना आजाराच्या संसर्गाने आपला प्रादुर्भाव वाढवला असुन शहरात व तालुक्यात कालपासुन लॉकडाऊनच्या नियमात शितील झाल्यावर बरीच व्यवसायीकांनी आपली दुकाने उघडल्याने सर्वत्र नागरीकांची गर्दी व वर्दळ उसळली असल्याचे दिसुन येत असल्याने सोशल डिस्टसिंगचा फज्जा उडाला असल्याने कोरोना बाधीत रुग्णांचा आकडा हा ५५ वर पोहचला असल्याने एकच खळबळ उडाली आहे. यापैकी आज यावल, न्हावी आणि अट्रावल येथे प्रत्येकी एक रूग्ण आढळून आला आहे. आढळून आलेले ५५ रूग्ण याप्रमाणे, यावल शहर ३०, फैजपूर ७, आमोदा २, भालोद ४, कोरपावली २, बोरावल २, चिंचोली ४, दहीगाव १, अट्रावल १, न्हावी १ असे आढळून आले आहे.

शहरी भागात ३० तर ग्रामीण भागातील रुग्णसंख्याही २५ झाली असुन, यावल तालुक्यातील एकुण कोरोना बाधितांची संख्याही ५५ वर पहोचली असल्याचे आरोग्य यंत्रणेकडुन सांगण्यात आले. रुग्णांची सातत्याने यावल तालुक्यातील वाढती संख्याही चिंताजनक व सर्वसामान्यांची चिंता वाढवणारी आहे. दरम्यान कोरोनाचा संसर्गास अद्यापही नागरीकांनी गांर्भीयाने घेतल्याचे दिसुन येत नसल्याने येणाऱ्या काळात कोरोना बाधीतांचा हा आकडा अधिक वाढण्याची दाट शक्यता प्रभारी तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.मानिषा महाजन यांनी पत्रकारांशी बोलतांना सांगीतले.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button