फैजपूर

फैजपूर येथे खान्देश नारीशक्ती व सरदार वल्लभभाई पटेल व्यापारी संकुल तर्फे लोहपुरुष जयंती साजरी

फैजपूर येथे खान्देश नारीशक्ती व सरदार वल्लभभाई पटेल व्यापारी संकुल तर्फे लोहपुरुष जयंती साजरी

सलीम पिंजारी

स्वतंत्र भारताचे पहिले उपपंतप्रधान व गृहमंत्री लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या १४४ व्या जयंतीनिमित्त फैजपूर येथे सरदार वल्लभभाई पटेल व्यापारी संकुल व खान्देश नारीशक्ती गृप तर्फे दिपाली गृप्स कार्यालयात प्रतिमेचे पूजन करुन अभिवादन करण्यात आले.भारत देश स्वतंत्र झाल्यानंतर वेगवेगळ्या संस्थानांमध्ये विखुरलेल्या अवस्थेत असताना सरदार पटेल यांनी सर्व संस्थाने खालसा करून देशाला एकसंध ठेवण्यासाठी कठोर पावले उचलली त्यामुळे आज भारत देश एकसंध दिसत आहे असे प्रतिपादन माजी सैनिक श्री.ज्ञानदेव चौधरी यांनी यावेळी केले.

सुरुवातीला ज्येष्ठ माजी सैनिक श्री.ज्ञानदेव चौधरी यांच्या हस्ते प्रतिमा पूजन कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली तसेच खान्देश नारीशक्ती अध्यक्षा सौ.दिपाली चौधरी झोपे यांच्या हस्ते माल्यार्पण करण्यात आले.यावेळी तेजल गॅस एजन्सी चे संचालक प्रदिप पाटील,ममता डाटाझोन संचालक बंटी भाऊ आंबेकर,संतोष हरी चौधरी,हितेंद्र भिडे,मनोज राणे,मनोज वायकोळे,देवेंद्र झोपे,वर्षा माळी,शितल महाजन,ममता वारके,कु.काव्या वारके,कु.गुणेश्री झोपे,कु.युगविरा भिडे इ.उपस्थित होते.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button