Chalisgaon

हेअर कटिंगच्या व्यवसायाला सन्मान मिळवून देणे हेच माझे ध्येय आहे – प्रसिद्ध हेअर स्टाईलिस्ट जावेद हबीब

हेअर कटिंगच्या व्यवसायाला सन्मान मिळवून देणे हेच माझे ध्येय आहे – प्रसिद्ध हेअर स्टाईलिस्ट जावेद हबीब

हेअर कटिंगच्या व्यवसायाला सन्मान मिळवून देणे हेच माझे ध्येय आहे - प्रसिद्ध हेअर स्टाईलिस्ट जावेद हबीब

चाळीसगाव प्रतिनिधी मनोज भोसले
माझे आजोबा , वडील हे दोघेही न्हावी होते. मला न्हाव्याचा मुलगा म्हणून म्हणून संबोधले जायचे. हा व्यवसाय करणारे त्यांच्याबद्दल व त्यांच्या कुटुंबाबद्दल समाजामध्ये सन्मान नव्हता. त्यावेळी पासून ठरवले कि या व्यवसायाला सन्मान मिळवून द्यायचा. जागतिक प्रतिष्ठा मिळवून द्यायची. त्यामुळे मी केसांचा डॉक्टर झालो. माझी कैची हेच माझे सर्वस्व झाली. मी आजही शिकतोच आहे. चाळीसगाव सारख्या ठिकाणी एवढा मोठा कार्यक्रम होतो याचा अर्थ समाज आता हेअर कटींगच्या व्यवसायात असणाऱ्या बांधवांना स्वीकारत आहे. या प्रयत्नाला मंगेश चव्हाण व त्यांच्या मित्र परिवाराची साथ लाभत आहे, असे प्रतिपादन सिताराम पहेलवान मळा येथील सुरू असलेल्या मंगेश चव्हाण मित्र परिवाराच्या वतीने आयोजित एकदंत सांस्कृतिक कला महोत्सवात प्रसिद्ध हेअर स्टायलिस्ट जावेद हबीब यांनी केले.

हेअर कटिंगच्या व्यवसायाला सन्मान मिळवून देणे हेच माझे ध्येय आहे - प्रसिद्ध हेअर स्टाईलिस्ट जावेद हबीब
संत सेना महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून तसेच जावेद हबीब व मान्यवरांचा सत्कार करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. एकदंत कला महोत्सवाचे संयोजक मंगेश चव्हाण यांनी प्रास्ताविकपर मनोगतात सांगितले की, “संत सेना  महाराज यांच्या जयंतीनिमित्त आश्वासित केल्याप्रमाणे जावेद हबीब यांना या एक दिवसीय कार्यशाळेसाठी बोलावले आहे. पूर्वी गावामधे न्हावी त्या संपूर्ण गावाचे नेटवर्क असायचा. एकूण वर्षाची एकदम पट्टी या समाजाला दिली जायची. पण काळ बदलला. प्रसिद्ध हेअर स्टायलिस्ट जावेद हबीब यांनी या व्यवसायाला जागतिक स्तरावर नेऊन ठेवले. न्हावी समाजासाठी काय देता येईल याचा विचार करताना फक्त किट देऊन तात्पुरत्या एका महिन्याची व्यवस्था लावण्यापेक्षा त्यांना स्किल देऊन आयुष्यभराची व्यवस्था लावण्याचा विचार केला. त्यातूनच ही प्रशिक्षण कार्यशाळा उभी राहिली. आज असं जाणवत आहे की एका दिवसाच्या कार्यशाळेने खूप कमी साध्य होईल. मात्र निवडणुकीनंतर सात ते आठ दिवस जावेद हबीब यांची कार्यशाळा आयोजित करणार असून, माझ्या नाभिक समाजातील बंधू आणि बघिणींना तसेच इतर ब्युटीशियन्स च्या ज्ञानामध्ये अधिकाधिक भर पडत जावी यासाठी प्रयत्न करणार आहे  यासाठी  तुमच्या मागे फक्त उभाच राहणार नाही तर तुम्हाला उभ करण्यासाठी उभा राहील असे देखील यावेळी मंगेश चव्हाण म्हणाले. 

हेअर कटिंगच्या व्यवसायाला सन्मान मिळवून देणे हेच माझे ध्येय आहे - प्रसिद्ध हेअर स्टाईलिस्ट जावेद हबीब
नाभिक समाजाला सन्मान देण्याच्या या उपक्रमाला आमच्या शुभेच्छा असतील व जेव्हा ही असा उपक्रम हाती घ्याल तेव्हा नाभिक समाज संघटनेच्या वतीने आम्ही कायम तुमच्यासोबत असु, असे प्रतिपादन नाभिक समाज संघटनेचे जिल्हाध्यक्ष नानासाहेब शिरसाठ यांनी व्यक्त केले यावेळेस चाळीसगांव नाभिक समाजाचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते. तसेच अभय वाघ यांनीही मनोगत व्यक्त केले.
प्रशिक्षण कार्यशाळेत जावेद हबीब यांनी त्यांच्या बिनधास्त स्टाईलने दिवसभर ही कार्यशाळा घेतली. दाढी कशा पद्धतीने करायची, कशापद्धतीने कापायची, माणसांचे केस व स्त्रियांचे केस यांना कशा पद्धतीने कापायचे, हेअर कट चे वेगवेगळे प्रकार, पार्लर च्या वेगवेगळ्या पद्धती त्यांनी स्वतः करून दाखवल्या. जावेद हबीब यांचे देशभरात 900 सलून असून त्यात दहा हजार लोक प्रत्यक्ष काम करतात.
प्रसिद्ध हेअर स्टायलिस्ट जावेद हबीब यांच्या मार्गदर्शनाने उपस्थित हेअर कटिंग सलून मध्ये काम करणारे कामगार, मालक, पार्लर चालवणाऱ्या महिला तसेच या विषयाची आवड असणारया नागरिकांनी प्रचंड गर्दी या कार्यशाळेला केली होती. या कार्यशाळेतून खूप काही शिकुन चालल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.
तसेच या कार्यक्रमास जिवाजी महाला युवामंच कार्यकर्ते यांचे विशेष सहकार्य लाभले. 
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राकेश चित्ते सर यांनी केले.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button