औषधी वनस्पती फोटो स्पर्धेत प्रा. रविंद्र माळी यांना प्रथम पुरस्कार
प्रतिनिधी :
अमळनेर: राष्ट्रीय फार्मसी वीक २०२० व जागतिक आयुर्वेद दिवस २०२० अंतर्गत हिंदु कॉलेज ऑफ फार्मसी, गुंटूर, आंध्र प्रदेश या महाविद्यालयाने राष्ट्रीय हर्ब (वनस्पती) फोटो स्पर्धा आयोजित केली होती. या स्पर्धेचा मुख्य हेतू ज्या वनस्पती पारंपारिक औषधी प्रणालीत वापरली जातात व ज्यावर शास्त्रीय पद्धतीने खूप कमी काम झालय, अश्या वनस्पतींचा ओरीजनल फोटो व त्यावर झालेले संशोधन या माहितीचे एक इ-ओरीजनल वनस्पती फोटो बूकलेट तयार करून तरुण संशोधकांना उपलब्ध करून देण्याचा होता. संपूर्ण देशातून आयुर्वेद, फार्मसी महाविद्यालाचे प्राचार्य, प्राध्यापक व विध्यार्थी अश्या विविध गटात हि स्पर्धा घेण्यात आली.
धन्वंतरी जयंती व धनत्रयोदशी (१३ नोव्हेंबर, २०२०) या दिवशी जाहीर झालेल्या निकालात खा. शि. मंडळ संचलित स्व. श्री. पंढरीनाथ छगनशेठ भांडारकर डी. फार्मसी महाविद्यालयाचे प्राचार्य रविंद्र गंगाराम माळी यांना प्राचार्य गटात प्रथम क्रमांकाचा पुरस्कार ऑनलाईन कार्यक्रमात प्रदान करण्यात आला. आपल्या परिसरात आढळणाऱ्या दगडीपाला, कंबरमोडी, जखमजुडी व एकदांडी अश्या विविध स्थानिक नावांनी परिचित वनस्पती (शास्त्रीय नाव : Tridax procumbans Linn. Family: Asteraceae) चा ओरीजनल फोटो व तिचे पारंपारिक व शास्त्रीय पध्दतीने सिद्ध झालेले उपयोग याची सविस्तर विवेचन पूर्ण माहिती सह प्रा. माळींनी यात सहभाग घेतला होता. पुरस्कार सोहळ्यास उत्तर देतांना प्राचार्य माळी यांनी आपल्या मनोगतात वनस्पतींचे NEW DRUG DISCOVERY मध्ये असलेले महत्व व ASPIRIN या जगातील सर्वात जास्त विक्री असलेल्या औषधाची वनस्पती पासून निर्मितीची कुळकथा विषद केली. सदर कार्यक्रमाचा YOUTUBE VIDEO हा https://youtu.be/ijuOBkg8Ovk या लिंक वर उपलब्ध आहे
त्यांच्या यशाबद्दल खा. शि. मंडळाचे कार्याध्यक्ष योगेश मुंदडे, कार्योपाध्यक्ष नीरज अग्रवाल, सदस्य हरी भिका वाणी, डॉ. संदेश गुजराथी, जितेंद्र जैन, प्रदीप अग्रवाल, कल्याण पाटील, चिटणीस डॉ. ए. बी जैन, फार्मसी महाविद्यालयाचे चेअरमन डॉ. बी. एस. पाटील, सर्व प्राध्यापक, कर्मचारी वृंद , विद्यार्थी, माळी समाज बांधव व मित्र परिवार यांनी अभिनन्दन केले.






