Maharashtra

आरोग्याचा मुलमंत्र….पाणी पिण्या च्या भांड्या चे आरोग्यादायी महत्व…

आरोग्याचा मुलमंत्र….पाणी पिण्या च्या भांड्या चे आरोग्यादायी महत्व…

मानवी शरीरामध्ये पाण्याचे प्रमाण हे ७० टक्के असते. अनेक डॉक्टर, तज्ज्ञांकडून देखील भरपूर पाणी पिण्याचा सल्ला दिला जातो. नियमित योग्य पाण्याचे सेवन केल्यास काही आजारांपासून देखील दूर राहण्यास तुम्हाला मदत मिळू शकते. आयुर्वेदानुसार, जेवण झाल्यानंतर पाणी पिणं जितकं गरजेचं आहे तितकंच तुम्ही पाणी कोणत्या भांड्यामध्ये भरून ठेवता हे देखील तितकंच महत्त्वाचं आहे. इतकंच नव्हे तर ज्या भांड्यामध्ये तुम्ही पाणी भरून ठेवता त्या भांड्याचा आकार देखील आपण पाहणं महत्त्वाचं ठरतं.

१) मातीची भांडी
आधीच्या काळात लोकं पाणी भरून ठेवण्यासाठी मातीच्या भांड्याचाच वापर करायचे. अजूनही गावाकडे स्वयंपाक घरात मातीच्या भांड्यामध्ये पाणी भरून ठेवलेलं तुम्हाला पाहायला मिळेल. आयुर्वेदानुसार पाणी नेहमी मातीच्या भांड्यामध्ये भरून ठेवलं पाहिजे. कारण मातीपासून बनवलेल्या भांड्यामध्ये हवा जाण्यासाठी जागा असते. यामुळे बराच काळ पाणी थंड तसेच ताज राहतं. महत्त्वाचं म्हणजे या पाण्याचे सेवन केल्यामुळे एसिडिटी तसेच त्वचेच्या समस्यापासून मुक्ती मिळते. या भांड्यातील पाण्याचे सेवन केल्यामुळे शारीरिक उर्जेमध्ये देखील सकारात्मक बदल जाणवायला सुरुवात होते

PA ची पातळी नियंत्रित ठेवण्यास मदत

२)तांब्याची भांडी

तांब्याच्या भांड्यात ठेवलेले पाणी पिण्याचे आणि या भांड्यामध्ये जेवण बनवण्याचे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत हे बहुतांश लोकांना ठाऊक आहे. बऱ्याच लोकांच्या घरामध्ये देखील पाणी भरून ठेवण्यासाठी तांब्याच्या भांड्यांचा वापर केला जातो. तांब हे एक अँटिऑक्सिडंट आहे. यामुळे पोटांचे विकार देखील दूर होण्यास मदत मिळू शकते. जर तुम्ही तांब्याच्या भांड्यातील पाण्याचे नियमित सेवन करत असाल तर पोटदुखी, गॅस, बद्धकोष्ठता, अतिसार अशा अनेक समस्यांपासून तुम्हाला मुक्ती मिळू शकते. तसेच तुमच्या चेहऱ्याला देखील याचे भरपूर लाभ मिळतात

तसेच वजन कमी करण्यास सुद्धा मदतगार असतात.

वजन कमी करण्यासाठी तुम्ही लाख प्रयत्न करत असता. मात्र तरी देखील वजन कमी होत नसेल तर तांब्याच्या भांड्यामध्ये पाणी भरून ठेवण्यास सुरुवात करा. आणि नियमित या पाण्याचे सेवन करा. यामुळे तुमचं वजन कमी होण्यास सुरुवात होईल. खरं तर तांब्यामुळे मानवी शरीरामधील अधिक फॅटचे प्रमाण कमी होते. यामुळे वजन झटपट कमी होण्यास मदत मिळते. त्याचबरोबरीने महत्त्वाची गोष्ट म्हणजे जेव्हा तुम्ही आरामाच्या स्थितीमध्ये असता तेव्हा तांब्याच्या मदतीने तुमचं फॅट बर्न होण्यास सुरुवात होते. तांब्याच्या भांड्यातील पाणी तुम्ही पित असाल तर झोपण्याच्या स्थितीमध्ये असताना देखील तुमचं वजन कमी होऊ शकतं.

उच्च रक्तदाब असलेल्या लोकांनी तांब्याच्या भांड्यातील पाण्याचे सेवन करणं गरजेचं आहे. जर तुम्ही या भांड्यातील पाण्याचे सेवन करत नसाल तर उच्च रक्तदाबाचा त्रास कमी न होता अधिक वाढू शकतो. पण एक गोष्ट लक्षात ठेवा गरजेपेक्षा देखील जास्त या भांड्यातील पाण्याचे सेवन केल्यास हे तुमच्या शरीरावर एखाद्या विषाप्रमाणे कार्य करू शकते. ज्या लोकांना कमी हिमोग्लोबीनची समस्या आहे अशा लोकांनी तांब्याच्या भांड्यातील पाण्यापासून दूर राहणंच गरजेचं आहे.

डॉ किशोर बाळासाहेब झुटे पाटील
होमिओपॅथी तज्ञ

संबंधित लेख

Back to top button