ओ साकी साकी रे..साकी साकी…अमळनेर शहरात उसळला दारूचा महापूर..अधिकारी फिल्डवरून गायब..
कायदा आणि सुव्यवस्थेबरोबरच वाहतूक आणि आरोग्याचा मोठा प्रश्न उपस्थित झाला आहे.
अमळनेर आज सुरू झालेल्या दारूच्या दुकानांमध्ये तुफान गर्दी असून शहरात दारूचा महापूर उसळला आहे. सुभाष चौक येथे तुफान गर्दी असून वाहतूक कोंडी झाली आहे. दारू घेणारे आणि त्यांना बघणारे यांची फार मोठी गर्दी उसळली आहे.
त्यातच बस स्थानक जवळील रस्त्याचे काम सुरू आहे. त्यामुळे तसेच दगडी दरवाजा जवळील वाहतूक देखील बंद करण्यात आली आहे. त्यामुळे सर्व वाहतूक ही गांधली पुरा भागातुन वळविण्यात आली आहे. याच भागात गूळ बाजार,कुंटे रोड,रेल्वे स्थानक इ कडे जाणाऱ्या वाहनांची आधीच गर्दी असते त्यात मधील रस्ते बंद असल्या मूळे सर्व वाहतूक ही ह्याच मार्गाने होत आहे.त्यात आज सुरू झालेले सुभाष चौकातील एच टिल्लूमल यांचे वाईन शॉप सुरू झाले आहे परिणामी येथे यात्रे चे स्वरूप प्राप्त झाले असून पोलीसांना येथे कायदा आणि सुव्यवस्था राखण्यात त्रास होत आहे. त्यातल्या त्यात येथील गर्दीचा उच्चांक पाहता ते देखील घाबरत आहेत.
विशेष म्हणजे काल भाजी विक्रेत्यांवर दांड गाई करणारे अधिकारी आज गायब झाले आहेत. एकही अधिकारी आज फिल्ड वर आढळून आले नाही.






