पारोळा येथील १८ वर्षीय युवक बेपत्ता..
प्रतिनिधी पारोळा ::> पारोळा येथील श्रीनाथजी नगर येथून १८ वर्षीय युवक बेपत्ता झाल्याची नोंद पारोळा पोलिस स्टेशनला करण्यात आली आहे. श्रीनाथजी नगरातील रहिवासी प्रफुल्ल सुनील बेलदार (वय १८) हा १२ सप्टेंबरला सकाळी ४.३० वाजता कोणास काहीही न सांगता घराबाहेर लावलेली दुचाकी (क्रमांक एमएच.१९.एटी.२७५८) घेऊन निघून गेला. तो उशिरापर्यंत घरी परत आला नाही. त्याचा सर्वत्र शोध घेऊनही उपयोग झाला नाही. यामुळे वडील सुनील बेलदार पारोळा पोलिस ठाण्यात तो हरवल्याची नोंद केली. तपास किशोर पाटील हे करत आहेत.






