Pandharpur

विस्थापित नगरमधील नुकसान झालेल्या नागरिकांना मनसे मदत करणार: दिलीप धोत्रे

विस्थापित नगरमधील नुकसान झालेल्या नागरिकांना मनसे मदत करणार: दिलीप धोत्रे

रफिक अत्तार पंढरपूर

पंढरपूर : पंढरपूर नगरपालिकेने शहरांतील विस्थापित नगरमधील लोकांची घरे आणि छोट्या व्यापाऱ्यांचे नुकसान केले. त्यामुळे या नुकसानीची पाहणी मनसेचे राज्याचे नेते दिलीप धोत्रे यांनी केली असून जे काही नुकसान झाले आहे त्याची भरपाई करून देणार असल्याचे सांगितले
या विस्थापित नगर मधील अनेकांच्या घराची नुकसान केल्यामुळे, त्याचे पत्रे, वासे, लाईट कनेक्शन आदी साहित्याचे जे नुकसान झाले आहे ,त्यासाठी आपण मदत करणार असल्याचे दिलीप धोत्रे यांनी या भागातील भेटी दरम्यान सांगितले आहे.यावेळी, तालुका अध्यक्ष शशिकांत पाटील, वैभव इंगोले, प्रथमेश पवार, प्रताप भोसले आदी मनसे पदाधिकारी उपस्थित होते.कोरोनाच्या संकटामुळे सर्वच लोक अडचणीत आले आहेत,, अनेकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत, अनेक लोक बेरोजगार झाले आहेत, अशातच शहरातील अनेक गरीब कुटुंबे ज्यांना राहायला घर नाही ,स्वतःची जागा नाही अशी कुटुंबे गेली कित्येक वर्षे नगरपालिकेच्या जागेत राहतात, त्या ठिकाणी वीज, पाणी, रस्ते आशा सुविधा आहेत, त्या ठिकाणी नगरपालिकेने कारवाई करू नये,गोरगरीब जनतेला नाहक त्रास देऊ नये, नगरपालिका प्रशासनाने चुकीच्या पद्धतीने कारवाई करू नये,कोणाचे तरी ऐकून जर गोरगरीब जनतेचे संसार उध्वस्त करणार असतील तर ते मनसे कदापि खपवून घेणार नाही, गोरगरीब जनतेसाठी मनसे रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करेल याची नोंद घ्यावी,

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button