Aurangabad

वैजापुरात आरोग्य विभागाचा भोंगळ कारभार पुन्हा उघड, तालुका वैद्यकीय अधिकार्‍यांचे दुर्लक्ष.

वैजापुरात आरोग्य विभागाचा भोंगळ कारभार पुन्हा उघड, तालुका वैद्यकीय अधिकार्‍यांचे दुर्लक्ष.

औरंगाबाद / गणेश ढेंबरे.

वैजापुर : वैजापुर तालुक्यातील रूग्णांसाठी मुख्य असलेले तालुका आरोग्य अधिकारी डॉ गुरुनाथ इंदुलकर यांचा ढिसाळ कारभार गुरूवारी सायंकाळी पुन्हा उघडकीस आला असून याबाबत सविस्तर माहिती अशी की वैजापुर तालुक्यातील वीरगाव येथील सय्यद नावाच्या इसमाचे वीरगाव येथे चहाचा हाॅटेल व्यवसाय असून बुधवारी या व्यक्तीस श्वास घेण्यास त्रास होत असल्याने या व्यक्तीने वैजापुर उपजिल्हा रुग्णालयात आपली कोरोना चाचणी करून घेतली. ज्यात त्याचा रिपोर्ट पाॅझीटिव्ह आला तरीही रूग्णालयाने त्यास दाखल न करता घरी पाठवुन दिले यावेळी लाडगाव प्राथमिक आरोग्य केंद्राचे डाॅक्टर राज बडे व कर्मचारी यांनी सदरील रूग्णांच्या सपर्कातील व्यक्तीचे स्वॅब घेतले व ते सर्व निगेटीव्ह आले परंतु पाॅझीटिव्ह रूग्णांस होत असलेल्या त्रासाबद्दल तालुका वैद्यकीय अधिकारी यांना कळवले परंतु गुरूवारी सायंकाळपर्यंत या रूग्णांस वैजापुर उपजिल्हा रुग्णालयातुन कोणतेही शासकीय वाहन न पाठवल्याने सायंकाळी या रूग्णांची तब्येत ढासळली.

यामुळे सदरील रूग्णाचा मुलगा शाहरूख यांस पाॅझीटिव्ह रूग्णांस सरकारी वाहन लोणी येथे गेल्याचे तालुका आरोग्य यत्रनेणे सांगुन खाजगी वाहनाणे येण्यास सांगितले व खाजगी वाहन न मिळाल्याने या मुलानें पोलिस पाटील ग्रामस्थांच्या मदतीने आपल्या मोटारसायकलवर पंधरा किलोमीटर अंतरावर उपजिल्हा रुग्णालयात आपल्या पाॅझीटिव्ह असलेल्या वडिलांना आनले. परंतु सुमारे एक तास रुग्णालयाच्या ढिसाळ नियोजनामुळे या रूग्णांस कोव्हीड सेटंरमध्ये अथवा उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले नव्हते. त्यानंतर या मुलानें घटनेबाबत पत्रकार यांना कळवले व घडलेल्या प्रकाराबद्दल सांगितले व रात्री उशिरा पत्रकारांनी जिल्हा अधिकारी याच्याकडे तक्रार करून घटनेला वाचा फोडल्यानंतर त्या रूग्णांस तत्काळ दाखल करून उपचार सुरू करण्यात आले. यावरून वैजापुर आरोग्य विभागाचा भोंगळ कारभार पुन्हा चव्हाट्यावर आल्याचा पहावयास आला. त्यामुळे आता तरी या दोषी अधिकारी यांच्यावर वरिष्ठ पातळीवर कारवाई होईल का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button