Jalgaon

गिरणा प्रकल्पात ९४ टक्के जलसाठा…धरणाच्या विसर्गाबाबत नदीकाठच्या गावांना प्रशासनाचा सतर्कतेचा ईशारा….

गिरणा प्रकल्पात ९४ टक्के जलसाठा…धरणाच्या विसर्गाबाबत नदीकाठच्या गावांना प्रशासनाचा सतर्कतेचा ईशारा….

जळगांव- जिल्हयातील हतनूर, गिरणा, वाघूर तीन मोठया प्रकल्पांपैकी जळगाव नाशिक जिल्हयाच्या सिमेवर असलेले गिरणा धरणाची प्रकल्पपाणीपातळी क्षमता ५२३.५५ दलघमीसह १८.४८७ टिएमसी आहे. या प्रकल्पात दि.१२ सप्टेबर पाण्ची आवक व प्रकल्पाचे परीचालन लक्षात घेता येत्या २४ तासात गिरणा धरणातून वाढीव पुराचे पाण्याचा विसर्ग केला जाउ शकतो. परीणामी नदीकाठच्या गावांतील नागरीकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला असल्याचे गिरणा प्रकल्प कार्यकारी अभियंता धमेंद्रकुमार बेहरे, उपविभागीय अभियंता. हेमंत. व्ही पाटील. व शाखा अभियंता एस. आर. पाटील यांनी म्हटले आहे. गिरणा प्रकल्प पाणलोट क्षेत्रपरीसरात तसेच नाशिक जिल्हयात गिरणा नदीक्षेत्रपरीसरात होत असलेल्या पावसामुळे प्रकल्पात पाण्याची आवक मोठया प्र्रमाणावर होत आहे. सद्यस्थितीत पाणीपातळी ४६९.१४ दलघमीसह १६.५७ टिएमसी नुसार ९४ टक्के उपयुक्त पाणीसाठा आहे. सध्या प्रकल्प पाणलोट क्षेत्रात तसेच नदीच्या पाणलोट क्षेत्रपरीसरात पाण्याची आवक सुरू आहे. येत्या २४ तासात गिरणा प्रल्पातून वाढीव पुराचे पाणी नदीपात्रात सोडण्यासाठी धरणाचे दरवाजे आवश्यकतेनुसार उघडण्यात येतील त्यामुळे गिरणा नदीला पूर येण्याची शक्यता आहे. त्यामुळे नदीकाठच्या गावालगतच्या नागरींकांनी सतर्क रहावे, जिवीत व वित्त हानी टाळावी असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button