Nashik

नाशिक महानगरपालिका अंगणवाडी कर्मचारी यांची हेळसांड कधी थांबवणार…?

नाशिक महानगरपालिका अंगणवाडी कर्मचारी यांची हेळसांड कधी थांबवणार…?

हिटलरवादी अधिकाऱ्यांना त्वरीत निलंबित करण्यासाठी भारतीय हितरक्षक सभा आंदोलन छेडणार”

नाशिक शांताराम दुनबळे

नाशिक -: कोरोना आजाराचे सावट नाशिक महानगरपालिका क्षेत्रात प्रचंड भिंतीचे वातावरण निर्माण झाले.अशा वातावरणात डॉक्टर, पोलिस,हाॅस्पिटल मधिल विविध कर्मचारी, पत्रकार, विविध सामाजिक संघटना यांनी आपला जीव मुठीत घेऊन आपली सेवा दिली.त्यामध्ये अनेकांना कोवीड योध्दा म्हणून काही मोठ्या नेत्यांनी अनेकांना सन्मानित ही केले आहे.
नाशिक महानगरपालिका क्षेत्रात कोवीड-१९ साठी होमिओपॅथिक प्रतिबंधात्मक औषध आर्सेनिक अल्बम-३० हे औषध नाशिकच्या मोतीवाला होमिओपॅथी मेडिकल कॉलेज च्या माध्यमातून सर्वैक्षण करून वाटप करण्यासाठी अंगणवाडी कर्मचारी यांना सांगण्यात आले.

१) कोविड-१९ चे पेशंट सर्वैक्षण अंगणवाडी कर्मचारी यांना देण्यात येऊ नये,असे महिला व बाल विकास मंत्रालय, महाराष्ट्र शासन यांच्याकडून शासन निर्णय असताना देखील नाशिक मनपा अंगणवाडी कर्मचारी यांना हे सर्वेक्षण करण्यासाठी प्रचंड दबाव व कायदेशिर धाक विभागीय अधिकारी यांच्यामार्फत दाखविण्यात आला.
२) प्रथमतः रजिस्टरवर प्रत्येक घरात जाऊन सर्वेक्षण करण्यासाठी सांगण्यात आले.या सर्वेक्षणाला जातांना अंगणवाडी कर्मचाऱ्यांना प्रतिबंधात्मक साहित्य ज्यामध्ये मास्क,फेसशिल्ड,हॅण्डग्लोज,सॅनिटायझर देण्यात आले नाही, अक्षरशः बेजबाबदार पध्दतीने मनपा मधील वरिष्ठ अधिकारी यांनी वागणूक दिली जात होती,यावर भारतीय हितरक्षक सभेच्या माध्यमातून आणि स्थानिक वर्तमानपत्रांच्या माध्यमातून अंगणवाडी कर्मचारी यांना सर्वेक्षण करण्यासाठी आवश्यक साहित्य देण्यात यावी,असे सांगावे लागले.तेव्हा प्रशासनाला जाग आली की,अंगणवाडी सेविकांना सर्वेक्षण करण्यासाठी प्रतिबंधात्मक साहित्य देण्याची आवश्यकता आहे.प्रशासनाच्या या हलगर्जीपणाचा प्रचंड त्रास अंगणवाडी कर्मचाऱ्यांना झाला, तसेच जेव्हा हे सर्व साहित्य दिले ते इतक्या हलक्या दर्जाचे होते आणि सॅनिटायझर घेण्यासाठी घरून बाटल्या घेऊन या, असे विभागीय अधिकारी यांनी सांगितले.प्रत्यक्ष मृत्यूशी लढा देण्याची लढाई लढणाऱ्या अंगणवाडी सेविकांना अत्यंत घृणास्पद वागणूक देणाऱ्या हिटलरवादी अधिकाऱ्यांचा जेवढा निषेध करावा तेवढा कमीच आहे.
३) ज्या लोकांचे वय जास्त आहे, शिवाय ज्यांना डायबिटीस,बीपी,हार्ट इत्यादी आजारांचा त्रास आहे,त्यांना सर्वेक्षण देऊ नये, असे असताना जर सर्वैक्षण आणि औषध वाटप केले नाही तर कामावरून काढण्याचे आदेश मनपा प्रशासनाने दिले,व वेळोवेळी या संदर्भात सूचना वजा धमक्या दिल्या आहेत.
४) कोविड-१९ संदर्भात काम करण्यासाठी प्रवासभाडे,मानधन भत्ता यापैकी काहीही न देता उलट कोरोनाची बाधा झालेल्या व हाॅस्पिटल मध्ये अॅडमिट झालेल्या अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे मानधनही कपात करण्यात आले.अंगणवाडी महिलांना अत्यंत तुटपुंजे मानधन आहे.अंगणवाडी सेविका ४,६००/- अंगणवाडी मदतनीस-४,२००/- इतकेच मानधन आहे.एवढ्या कमी मानधनात अक्षरशः आर्थिक पिळवणूक केली जात असून मानसिक आणि शारीरिक त्रासही दिला जात आहे.जे अमानवीय आणि असंवेदनशील आहे,ज्याचा भारतीय हितरक्षक सभेने अनेक आंदोलनांच्या माध्यमातून अनेकदा मनपा प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिले आहे.
५) मनपा प्रशासन आणि मोतीवाला होमिओपॅथी काॅलेज च्या माध्यमातून नाशिक शहरात आतापर्यंत अंगणवाडी कर्मचाऱ्यांना प्रथम रजिस्टरवर सर्वेक्षण करण्यासाठी सांगण्यात आले, दुसऱ्या टप्प्यात सर्वेक्षण फाॅर्म आणि कोविड-१९ होमिओपॅथी आर्सेनिक अल्बम-३० या औषधांच्या गोळ्या वाटप करण्यासाठी सांगण्यात आले, तिसऱ्यांदा पुन्हा सर्वेक्षण आणि गोळ्या देण्यासाठी सांगण्यात आले आणि आता पुन्हा घरातील प्रत्येकाला वैयक्तिक एक औषधाची आणि प्रत्येकाचा स्वतंत्र सहमती फाॅर्म भरून घेण्यासाठी विभागीय अधिकारी यांनी सांगितले आहे.यासंदर्भात मोतीवाला होमिओपॅथी काॅलेज च्या प्रमुख डॉ.शुक्ला यांच्याशी भारतीय हितरक्षक सभेच्या माध्यमातून संवाद साधला असता,त्यांनी स्पष्ट केले आहे की,या औषधांच्या गोळ्या लोकांना एकदाच द्यायच्या आहेत, म्हणून एका औषधांच्या बाटलीत दोन महिन्यांचा डोस देण्यात आला आहे.दोन किंवा तीन वेळा डोस देण्याची आवश्यकता नाही,व हे औषध वाटण्याचे नियोजन मोतीवाला होमिओपॅथी काॅलेज कडे नव्हते यांची प्रमुख जबाबदारी मनपा विभागीय अधिकारी यांची होती.यावरून हे स्पष्ट होते की, मनपा प्रशासनाने या मध्ये ढिसाळ व ढोबळ नियोजन केले आहे.व फक्त टार्गेट पूर्ण करण्यासाठी अंगणवाडी कर्मचारी यांना वेठिस धरले आहे.
७) अंगणवाडी कर्मचारी पुन्हा पुन्हा सर्वेक्षण करण्यासाठी आणि पुन्हा पुन्हा औषधांच्या गोळ्या देण्यासाठी येत असल्याने अनेक नागरिकांनी या बाबतीत नाराजी व्यक्त केली आहे.पुन्हा-पुन्हा आमची माहिती का घेतली जात आहे.मागिल दिलेल्या गोळ्या घरात पडून आहेत, पुन्हा त्याच त्याच गोळ्या का देत आहात.अशा अनेक बाबी लोक मांडत असून लोकांच्या रोषाला अंगणवाडी कर्मचाऱ्यांना सामोरे जावे लागत आहे,आणि खुर्चीत बसून काही अधिकारी अरेरावी करीत आहे, दोन्ही कडून अंगणवाडी कर्मचाऱ्यांना रोष पत्करावा लागत आहे.हे अत्यंत दु:खदायक असून प्रशासनातील अधिकारी माणूसकीची वागणूक देत नाही,यांचा आम्ही जाहीर निषेध करीत आहोत.

यासंदर्भात ज्या ज्या अधिकाऱ्यांनी हलगर्जीपणा केला आहे आणि चुकीचे नियोजन करून मनपाचा निधी, लोकांना अतिरिक्त औषध आणि अंगणवाडी कर्मचाऱ्यांना वेठीस धरण्याचा प्रयत्न केला आहे,अशा अधिकाऱ्यांविरुद्ध आंदोलन छेडण्याचा आणि त्यांना निलंबित करण्याची मागणी करण्यासाठी आंदोलन करण्याचा इशारा भारतीय हितरक्षक सभा भारत देत आहे.अशी माहिती किरण मोहिते.”सभानायक”भारतीय हितरक्षक सभा, भारत यांनी दिला आहे

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button