रेड डॉट ? एक आवाहन
संदीप गायकवाड, उपमुख्याधिकारी अमळनेर नगरपरिषद
अमळनेर
सध्याची कच-या संदर्भातील समस्या फार बिकट होत चालली आहे……. म्हणजेच कच-याची विल्हेवाट कशी लावायची हा प्रश्न खूप गंभीर होत चालला आहे…. Amalner शहरामधे दररोज १८ टन कचरा गोळा केला जातो…… हा कचरा गोळा करण्यापासून ते त्याची विल्हेवाट लावाण्यापर्यंत सफाई कामगारांना अनेक प्रक्रियांना सामोरे जावे लागते…

रोज आपल्या सोसायटीमध्ये कचरा गाडी येते. त्यातील सफाई कामगार प्रत्येक घरातून, कॉलनीतून, सोसायटीतून हा कचरा आधी गोळा करतात.
हा कचरा गोळा करुन झाल्यावर हे सफाई कामगार त्यातील ओला कचरा व सुका कचरा हा वेगवेगळा करतात. ब-याच वेळा अगदी पेपरमधे किंवा plastic पिशवीतील कचरा ओला आहे की सुका आहे ते पाहण्यासाठी त्यांना ते उघडून पाहावे लागते……

या कच-यामध्ये बरेचदा पेपरमधे घडी घालून घातलेले सॕनेटरी नॕपकीन आणि लहान मुलांच्या व आजारी माणसांच्या डायपरचाही समावेश असतो…… जेव्हा सफाई कामगार हे घडी घातलेले पेपर उघडून पाहतात तेव्हा त्यांना खूप किळस येते…… बिचारे खूप अस्वस्थही होतात….. रडतात … त्यांना हे सर्व पाहून किळस येते. जेवणही जात नाही ……

पण काय करणार ?
म्हणूनच यासाठी एक स्वच्छता अभियान राबविण्यात येत आहे
तुमच्या घरातील कच-यामध्ये जर असे सॕनेटरी नॕपकीन व लहान मुलांचे व वृद्ध आजारी माणसांचे डायपर्स असतील तर पुढील गोष्टीकडे लक्ष द्या……

*असे हे सॕनेटरी नॕपकीन व डायपर्स एका पेपरमधे घालून त्याची व्यवस्थित घडी घाला व त्यावर एक रुपये आकाराचा किंवा त्याहून थोडासा मोठा रेड डॉट काढा (उदाहरणार्थ ?) … यासाठी घरामध्ये एक रेड कलरचं स्केच पेन नेहमीसाठी असू द्या…… रेड स्केच पेनने असा डॉट काढता येतो….*
हे असे केल्याने सफाई कामगारांना समजेल की यामधे नॕपकीन किंवा डायपर्स आहेत….. तेव्हा ते उघडून बघणार नाहीत….
सध्या अनेक संस्था मिळून ही मोहीम राबवत आहेत…… पण ही गोष्ट सर्वांपर्यंत पोहचत नाही…..
सध्याचे whatsapp व फेसबुक ही प्रभावी प्रसार माध्यमं आहेत…..
तुम्ही हा मेसेज जास्तीत जास्त लोकांना आणि विशेष म्हणजे महिला भगिनींना, तुमच्या घरातील, नात्यातील, प्रत्येक महिलेला पाठवा…… कारण घरातील साफसफाई प्रामुख्याने स्त्रिया पाहात असतात……. त्यांच्या पर्यंत हा मेसेज पोहचणे खूप गरजेचे आहे……..
कचरा व सफाई कामगारा संदर्भात जनजागृती होणे आवश्यक आहे
कचरा व सफाई कामगारा बाबतीत या गोष्टी आपण एक जबाबदार, सुजाण नागरिक म्हणून प्रत्येकाला माहित असणे आवश्यक आहे…

कारण आपण आपल्या घरातला कचरा टाकताना सफाई कामगारांच्या व त्यांच्या कुटुंबीयांच्या आरोग्याची काळजी घेणेही तेवढेच महत्त्वाचे आहे……
तर आपण सर्वांनीही या मोहिमेमध्ये सहभागी होऊया.






