Chalisgaon

पेरू प्रक्रिया उद्योग व कोल्ड स्टोरेज साठी प्रयत्न करणार – आमदार मंगेश चव्हाण

पेरू प्रक्रिया उद्योग व कोल्ड स्टोरेज साठी प्रयत्न करणार – आमदार मंगेश चव्हाण

बहाळ येथे पेरू – बोर महोत्सवाचे उद्घाटन

नितीन माळे

चाळीसगाव – मीनी कोकण म्हणून ओळखल्या जाणाऱ्या चाळीसगाव तालुक्यातील बहाळ येथील प्रसिद्ध पेरू आणि बोर ला व्यापक प्रसिद्धी आणि बाजारपेठ मिळावी या उद्देशाने पं.स.सभापती सौ.स्मितलताई बोरसे व माजी पं.स.सदस्य दिनेशभाऊ बोरसे यांच्या संकल्पनेतील पेरू – बोर महोत्सवाचे उद्घाटन खासदार उन्मेशदादा पाटील व आमदार मंगेशदादा चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी आमदार मंगेश चव्हाण यांची पेरू व बोर यांची तुला करण्यात आली. बहाळ व परिसरातील पेरू – बोर उत्पादक शेतकऱ्यांनी आपल्या शेतातील विविध प्रकारची फळे प्रदर्शनासाठी ठेवली होती.

मंचावर प्रदर्शनाचे उद्घाटक म्हणून खासदार उन्मेशदादा पाटील, पं.स.सभापती सौ.स्मितलताई दिनेश बोरसे व दिनेशभाऊ बोरसे, उपसभापती संजय पाटील, नगराध्यक्षा सौ.आशालताताई विश्वास चव्हाण, मार्केट सभापती सरदारशेठ राजपूत, न.पा.गटनेते संजय रतनसिंग पाटील, नगरसेवक घृष्णेश्वर पाटील, जि.प.सदस्या सौ.मंगलताई भाऊसाहेब जाधव, सौ.मोहिनी अनिल गायकवाड, पं.स.सदस्य सुभाष पैलवान, पियुष साळुंखे, सुनील पाटील, दत्तू मोरे, भाजपा तालुका उपाध्यक्ष कपिल पाटील, रा.वि.संचालक सुधीर आबा पाटील, मार्केट संचालक मच्छिंद्रभाऊ राठोड, सौ.अलकनंदाताई भवर, सौ.संपदाताई उन्मेश पाटील, सौ.प्रतिभाताई मंगेश चव्हाण, नगरसेवक बापू अहिरे, नगरसेविका सौ.विजया प्रकाश पवार, सौ.विजया भिकन पवार, नमोताई राठोड, वाय.आर.सोनवणे, माजी नगरसेवक निलेश महाराज, कैलास पाटील, बहाळ गावाचे सरपंच, उपसरपंच, ग्रा.प.सदस्य. विकासो चेअरमन, व्हा.चेअरमन आदी उपस्थित होते.

आमदार मंगेश चव्हाण यांनी यावेळी उद्घाटनपर मनोगत व्यक्त करताना सांगितले की पुराणकालीन बहुलादेवी माता मंदिर, श्रीक्षेत्र ऋषी पांथा या दैवतांच्या सानिध्यात वसलेले बहाळ गाव, जेव्हडी या गावाची जमीन कसदार तेव्हडीच इथली माणस दमदार आहेत, अतिशय मेहनतीने या भागातील शेतकऱ्यांनी नवनवीन तंत्रज्ञान वापरून बहाळ गावाचे नाव देशभरात नेले आहे, आज दिनेशभाऊ व स्मितलताई यांनी एक पाउल पुढे जात आगळ्यावेगळ्या संकल्पनेवर आधारित पेरू – बोर महोत्सव आयोजित करून आदर्श निर्माण केला आहे त्याबद्दल त्यांचे अभिनंदन केले. आज पेरू वर आधारित अनेक खाद्य पदार्थ मेट्रो सिटी मध्ये प्रसिद्धीस येत आहेत. सदर खाद्य पदार्थ उत्पादन करणाऱ्या कंपन्यांना आपल्या बहाळ येथील पेरू पुरवता यावेत यासाठी एक वेगळी बाजारपेठ निर्माण करण्यासाठी पुढाकार घेणार असून साठवणूक करण्यासाठी कोल्ड स्टोरेज उभारण्यासाठी देखील प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

ते पुढे म्हणाले अवकाळी पावसामुळे मोठ्या प्रमाणात या भागातील पेरू बागांचे नुकसान झाले होते, यासाठी शासनाकडून मोठ्या प्रमाणात मदतीची अपेक्षा असताना शासनाने मात्र एक रुपयाचीही तरतूद न करता शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसली आहेत. मात्र शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी विधानसभेत असो की बाहेर असो मी सदैव शेतकऱ्यांच्या सोबत असल्याचा विश्वास देखील आमदार चव्हाण यांनी यावेळी शेतकऱ्यांना दिला.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button