नवनिर्वाचित आमदार मा.मंगेशदादा चव्हाण यांचा स्वागत व सत्कार
काल दि.१९ नोव्हेंबर रोजी मंगळवारी वृंदावन नगर येथील रहिवासी बंधू-भगिनींनी नवनिर्वाचित आमदार मा.मंगेशदादा चव्हाण यांचा स्वागत व सत्कार सोहळा केला.
यावेळी कार्यक्रमाला अबालवृद्धांनी ऊत्स्फुर्तपणे सहभाग नोंदविला. परिमल साहित्य-कला मंच चे संस्थापक अध्यक्ष मा.प्रा.आप्पासाहेब साळुंके तसेच संस्थेचे अध्यक्ष मा.दिनेश चव्हाण व खान्देश साहित्य परिषदेचे संस्थापक अध्यक्ष मा.साहेबराव मोरे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या कार्यक्रम प्रसंगी मा.मंगेशदादा चव्हाण साहेबांनी सत्काराला उत्तर देतांना आमदार या नात्यानेच नव्हे तर जनतेचा एक सेवक या नात्याने चाळीसगाव नगरीचा विकास करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत राहील असे आश्वासन दिले, निर्भयपणे आपल्या समस्या मला सांगाव्यात असे उपस्थित नागरिकांना आवाहन केले. त्या समस्या सोडविण्यास मी कटिबद्ध आहे असेही ते ठाम पणे म्हणाले. त्यांचा दूरदृष्टीपणा व काम करण्याची हातोटी खूप विश्वसनीय असल्याचे मा.शिवाजी साळुंखे यांनी प्रतिपादन केले.
परिसरातील बंधू-भगिनींनी आयोजित केलेल्या कार्यक्रमाला जातिने उपस्थित राहून त्यांची मने जिंकून मा.मंगेशदादा चव्हाण यंनी एक आगळा वेगळा पायंडा पाडला.
कार्यक्रमाचा शेवट चहापानाने झाला. मा.मंगेशदादांनी बालगोपाळांना कॅडबरी देताच बालमंडळी खूप आनंदली. छोटेखानीच परंतु अत्यंत मनोरंजक व उद्बोधक अशा या वैशिष्ट्यपूर्ण कार्यक्षमाची जनमाणसवर अमिट छाप पडली.






