उंदरी सुरगाव येथे १४४व्या बिरसा मुंडा जयंती विविध कार्यक्रमांनी साजरी .
अनिल पवार
उंदरी सुरगाव येथे जय सेवा बिरसा मुंडा गोंडवाना जणवन मंडळामार्फत आदिवासी क्रांतिवीर बिरसा मुंडा यांच्या १४४वी जयंती विविध कार्यक्रमांनी साजरी करण्यात आली.
या निमित्ताने बिरसा मुंडा मैदान उंदरी या पटांगणात आदिवासी जत्रोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. हुसनजी पंधरे यांच्या हस्ते जत्रोत्सवाचे उद्घाटन करण्यात आले.
१४४व्या बिरसा मुंडा जयंती निमित्त उंदरी सुरगाव येथे काढण्यात आलेल्या भव्य रैलीला कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी संजय गांधी निराधार योजना उमरेड अध्यक्ष वसंताजी पंधरे यांनी पिवळी झेंडी दाखवून सुरवात केली .तत्पूर्वी सर्व मान्यवरांनी क्रांतिकारी भगवान बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेचे पूजन केले .व
संपूर्ण गावात रैली जाऊन क्रांतिकारी बिरसा मुंडा मैदानात रैलीचा समारोप झाला .या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथि म्हणून सुरगावच्या सरपंच विशाखा गायकवाड , उपसरपंच सुधाकर गाडबैल, कामठी पंचायत समितीचे माझी सभापती सेवक उईके होते .प्रमुख मार्गदर्शक म्हणून चांप्याचे सरपंच अतिश पवार यांनी आदिवासी समाज जागृतीवर मार्गदर्शन केले .
कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून चांप्याचे माझी सरपंच सुरेश मसराम , परसोडीचे माझी सरपंच शंकर वलके, बोथलीचे माझी सरपंच देविदास मसराम , खैरी ग्रामपंचायतचे माझी सरपंच मधुकर मडावी , पिंपळचे माझी सरपंच हिरामन तोडासे होते .
कार्यक्रमाला तारपा नाच, ढोल नाच, सांगड नाच, गौरी नाच, टिपरी नाच, धुमश्या तसेच नदी, घोडा, वाघ, विंचू अशी बत्तीस सोंगे असलेला बोहाडा आणि विशेष आकर्षण असलेला गंगा गौरी नाच आदी पारंपरिक संस्कृतीचा अविष्कार येथे पाहण्यास मिळाला.यावेळी आदिवासी समुदायाच्या बांधवांनी प्रचंड अशी गर्दी केली .असून कार्यक्रमाची सांगता महाप्रसाद वितरणाने करण्यात आली .






