रेल्वे स्टेशनसह शहर सुशोभीकरणसाठी प्रयत्न करणार – आमदार मंगेशदादा चव्हाण
रेल्वे स्टेशन परिसरात स्वच्छता अभियानाला सुरुवात
मनोज भोसले
आज दि. 2 नोव्हेंबर 2019 शनिवार रोजी चाळीसगाव रेल्वे स्टेशन येथे स्वच्छ भारत अभियान अंतर्गत स्वच्छता मोहीम आमदार मंगेशदादा चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत राबविण्यात आली.
देशाचे पंतप्रधान मा. नरेंद्रजी मोदी साहेब यांच्या संकल्पनेतून सुरू झालेल्या स्वच्छ भारत अभियान माध्यमातून आज देशभरात अनेक ठिकाणी विविध उपक्रम व मोहिमा राबविल्या जात असून नागरिकही उत्स्फूर्तपणे मोठ्या प्रमाणात यात सहभागी होत असतात. फक्त रेल्वे स्टेशनच नाही तर संपूर्ण शहर स्वच्छ व सुंदर करण्यासाठी शासन व प्रशासनाच्या माध्यमातून नक्कीच प्रयत्नशील राहीन असे प्रतिपादन आमदार मंगेशदादा चव्हाण यांनी व्यक्त केले.
यावेळी उपक्रमाच्या निमित्ताने रेल्वे मंडळ चिकित्सा अधिकारी डॉक्टर ठोके, स्टेशन प्रबंधक सुहास महाले यांच्यासह आरपीआय जिल्हाध्यक्ष आंनद जी खरात, नगरसेवक सोमसिंग आबा राजपूत, चिरागुद्दीन शेख, चंद्रकांत तायडे, भास्कर पाटील, भाजपा तालुका सरचिटणीस प्रा.सुनील निकम, शहर सरचिटणीस एड. प्रशांत पालवे, अमोल नानकर, माजी नगरसेवक अविनाश चौधरी, प्रभाकर चौधरी, मनोज गोसावी, जितेंद्र पाटील, जगदीश चव्हाण, व्यापारी आघाडीचे संजय पाटील, सचिन पाटील सर यांच्यासह पदाधिकारी – कार्यकर्ते उपस्थित होते.
यानंतर आमदार मंगेशदादा चव्हाण यांनी स्टेशन प्रबंधक यांच्यासह इतर रेल्वे प्रशासनाच्या अधिकाऱ्यांसह विविध विषयांवर चर्चा केली, त्यात चाळीसगाव रेल्वे स्टेशन परिसरात विविध संस्था व कलाकारांना सोबत घेऊन भित्तिचित्रे रंगविण्याची संकल्पना सर्वांसमोर आमदार चव्हाण यांनी मांडली. लवकरात लवकर या संकल्पनेवर काम करून सुंदर भित्तीचित्रे चाळीसगाव करांना बघावयास मिळतील.
#स्वच्छ_भारत_अभियान
#चाळीसगाव_रेल्वे_स्टेशन






