मौजे वडगाव सरपंचांच्या पत्नीचा मृतदेह आढळला पंचगंगेच्या पात्रात !
अनिल पाटील पेठ वडगाव
मागील दोन दिवसांपासून बेपत्ता झालेल्या महिलेचा मृतदेह शिरोली पुलाजवळील पंचगंगा नदीपात्रात आज (बुधवार) सकाळी आढळून आला. शीलाबाई काशिनाथ कांबळे (वय ५४, रा. मौजे वडगाव, ता. हातकणंगले) असे त्यांचे नाव असून त्या मौजे वडगाव सरपंचांच्या पत्नी आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हातकणंगले तालुक्यातील मौजे वडगाव येथे शीलाबाई कांबळे कुटुंबियांसोबत राहतात. त्याचे पती काशिनाथ कांबळे हे मौजे वडगाव गावचे सरपंच आहेत. शीलाबाई कांबळे या सोमवारी (दि. २८) सकाळी फिरण्यासाठी बाहेर पडल्या होत्या. मात्र, त्या घरी परतल्या नाहीत. याबाबत कांबळेच्या नातेवाईकांनी शिरोली औद्योगिक वसाहत पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती.आपण वाचत आहात माहिती सेवा ग्रूप पेठवडगावची पोस्ट,आज सकाळी शिरोली पुलाजवळ नदीपात्रात एका महिलेचा मृतदेह तरंगताना नागरिकांनी दिसला. तसेच याबाबत शिरोली औद्योगिक वसाहत पोलिसांना याची माहिती दिली. मृतदेह बेपत्ता असलेल्या शिलाबाई कांबळे यांचा असल्याचे समजताच, पोलिसांनी याची माहिती कांबळे याच्या नातेवाईकांना दिली.






