आटपाडी

आदिती पाटीलची गणित प्रावीण्यपूर्व परीक्षेत गरूड भरारी.

आदिती पाटीलची गणित प्रावीण्यपूर्व परीक्षेत गरूड भरारी.

सुभाष भोसले -कोल्हापू्र
जय हनुमान शिक्षण संस्था संचालित न्यू हायस्कूल बेलवळे खुर्द तालुका कागल येथील इ ५ वी ची विदयार्थीनी कुमारीआदिती संतोष पाटील ही गणित प्राविण्य पूर्व परीक्षेत पात्र ठरलीआहे.कु आदिती ही न्यू हायस्कूल ,बेलवळे खुर्द चे मुख्याध्यापक एस आर पाटील यांची कन्या असून तिला ए ए यादव ,वाय के खद्रे,सौ कोतेकर तर आदितीची आई रूपाली व शाळेतील इतर शिक्षकवृंद यांचे मार्गदर्शन लाभले .जय हनुमान शिक्षण् संस्थेचे संस्थापक दिनकरराव कोतेकर यांची आदितीला प्रेरणा मिळाली.

आदितीला स्पर्धा परिक्षेची आवड आहे तिला स्पर्धा परिक्षा देवून प्रशासकीय सेवेत काम करून जनसेवा करण्याची इच्छा आहे. तिला वेगवेगळ्या लेखकांची पुस्तके व इतर साहित्य वाचण्याचा छंद आहे.
आदितीला मिळालेल्या यशाबद्दल संस्थेचे व तिचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button