तिसगाव येथे शेतकरी मेळावा संपन्न
सुनील नजन
अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील तिसगाव येथील सिद्धीविनायक मंगल कार्यालयात प्राजक्तदादा तनपुरे यांच्या नेतृत्वाखाली व चंद्रकांत पाटील म्हस्के यांच्या अध्यक्षतेखाली शेतकरी मेळावा संपन्न झाला. यावेळी कान्हू म्हस्के सर, दत्ता कोल्हे,नितीन लवांडे, अमोल वाघ,सतिश क्षेत्रे,गोविंद मोकाटे महेबुब शेख यांची भाषणे झाली. सर्वांनी विद्यमान आमदाराच्या कार्यपद्धती वर जोरदार टीका केली.
राहुरीचे भावी आमदार म्हणून प्राजक्तदादा तनपुरे यांचेच कौतुक केले.प्रारंभी तनपुरे यांची गावातून सवाद्य मिरवणूक काढण्यात आली होती त्यांनी सलाबतखान बाबा दर्ग्यात जाऊन फुलांची चादर अर्पण केली याप्रसंगी राहुरी-पाथर्डी तालुक्यातील अनेक गावातील कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. त्याच्यामध्ये युवानेते बाबासाहेब बुधवंत, अण्णासाहेब बाचकर, राजेंद्र म्हस्के सराफ,कदम साहेब,उद्धव दुसंग,शरद मरकड,अविनाश नरवडे,संजय लवांडे, अनिल रांधवणे,कुंडलिक मचेसर,जालिंदर वामन,छानराज क्षेत्रे,राजेंद्र पाठक,यांचा समावेश होता. प्रतिनिधी सुनिल नजन अहमदनगर