नंग्या तलवारीचे वार अंगावर घेत आगामी वर्षांची मीरीच्या होईक यात्रेतील भविष्यवाणी,तृतीयपंथी चे राज्य येण्याचे संकेत.
सुनील नजन
अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील मीरीच्या विरभद्र (बिरोबा) यात्रेच्या होईकात आगामी काळात हिजड्यांचे राज्य येण्याचे स्पष्ट संकेत दिले आहे. बिरोबा भक्त सिताराम बाळाजी भगत यांनी नंग्या तलवारीचे छत्तीस वार अंगावर घेत आगामी काळातील भविष्य कथन केले आहे. दिवाळीच्या काळात व चंपाषष्टीला काही ठिकाणी पाऊस पडेल,कापसाला मोठ्या प्रमाणात भाव मिळेल. आणि गहू हरबरे जोडीने पिकतील व सव्वा पटीने विकतील.
आई मुलाची ताटातूट होउन रक्ताचा पूर वाहील. बैलांच्या किंमती मोठ्या प्रमाणात वाढतील.ढगफुटी होईल, सत्य मार्गाने नशिबात असेल तेवढेच मिळेल.पुढील वर्षी जठुड साधेल पण आषाढ महिन्यात पाउस पडनार नाही. अशी भविष्यवाणी वर्तविण्यात आली आहे.
गंगेच्या पाण्याने जलाभिषेक, छबिनामिरवणूक, शोभेचे दारुकाम,जागरण गोंधळ, कलावंतांच्या हजेऱ्या,राजकुमार जादुगार यांचे जादुचे प्रयोग,शिर्डीचे प्रसिद्ध व्यापारी रलतीलाल लोढा काका यांच्या वतीने भाविकांना महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. सायंकाळी कुस्त्यांचा जंगी हंगामा भरविण्यात आला होता. संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध असलेल्या या यात्रेला मोठ्या प्रमाणात भाविकांनी गर्दी केली होती.
या यात्रेसाठी, आसाराम भगत,जबाजी निर्मळ, नामदेव सोलाट, युवा नेते जगदीश सोलाट,अण्णासाहेब मीरीकर,रावसाहेब मीरीकर, गौरव मीरीकर, सौरभ मीरीकर, राजाभाऊ मीरीकर, दिपक टाकळकर, बाबासाहेब निर्मळ, चंद्रकांत सोलाट, सुर्यकांत सोलाट, राजेंद्र भगत,अशोक सोलाट,आणि यात्रा कमेटी यांनी विशेष सहकार्य केले. प्रतिनिधी सुनिल नजन अहमदनगर जिल्हा






