मंगेश चव्हाण यांचे गावागावात उत्स्फूर्तपणे स्वागत
मनोज भोसले
भाजपा – शिवसेना – रिपाई महायुतीचे अधिकृत उमेदवार मंगेश रमेश चव्हाण यांचा आज दि.९ ऑक्टोबर २०१९ रोजीचा १८ गावांमध्ये प्रचार
प्रचार दौऱ्याचा शुभारंभ चाळीसगाव शहरातील नारायण वाडी येथील देवीमाता मंदिरात नारळ वाढवून करण्यात आला, त्यानंतर टाकळी प्र.चा, ओझर,पातोंडा, मुंडखेडा खु. मुंडखेडा बु. बोरखेडा खु. आदी गावागावात त्यांचे उत्स्फूर्त स्वागत करण्यात आले.*
*ठिकठिकाणी सुवासिनींनी मंगेशदादा यांचे औक्षण करून विजयासाठी शुभेच्छा दिल्या. प्रचार दौऱ्यात आबालवृद्धांनी सहभाग नोंदवला.
*लविधानपरिषदेच्या आमदार सौ.स्मिताताई वाघ यांनी देखील प्रचार दौऱ्यात सहभागी होऊन पदाधिकारी – कार्यकर्ते यांचा उत्साह वाढवला.
यावेळी भारतीय जनता पक्षाचे राज्यस्तरीय पदाधिकारी, पं. स. सभापती – उपसभापती, नगराध्यक्षा, जि. प. व पं. स. सदस्य, नगरसेवक सर्व गावातील सरपंच – उपसरपंच, शक्तीकेंद्र – बुथकेंद्र प्रमुख, पदाधिकारी – कार्यकर्ते उपस्थित होते.






