अखेर गर्दी जमवून किर्तन घडवून आणणाऱ्या आयोजकांवर गुन्हा दाखल..!
अमळनेर येथे काल ऍड ललिता पाटील यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त मा इंदुरीकर महाराज यांच्या किर्तनाचा कार्यक्रम आयोजित केला होता.या कार्यक्रमाला कोरोना नियमांचे उल्लंघन करत हजारो लोकांनी हजेरी लावली होती. ह्या संदर्भाची बातमी देखील ठोस प्रहारने प्रकाशित केली होती. आणि कार्यवाही करण्याची मागणी जनतेतून केली जात होती.
या अनुषंगाने अमळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून फिर्यादी हितेश चिंचोरे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार आरोपी ऍड ललिता पाटील यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त 200 पेक्षा अधिक लोक जमवले गर्दी करून किर्तनाचा कार्यक्रम आयोजित केला.म्हणून
भारतीय दंड संहिता कलम 188,269, साथीचे रोग अधिनियम कलम 3 आणि आपत्ती व्यवस्थापन नियम कलम 51 (ख) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पुरुषोत्तम पाटील हे करत आहेत.






