लसीकरण केंद्रावर आरोग्य विभागाचा नियोजन शून्य कारभार
बीड : परळीतील कोरोना लसीकरण केंद्रावर आज सकाळपासूनच नागरिकांनी प्रचंड गर्दी केली होती. ग्रामीण भागातील नागरिकांसाठी लोकनेते गोपीनाथ मुंडे सभागृहात कॅम्प लावण्यात आला आहे. या कॅम्पमध्ये आज ग्रामीण भागातील नागरिकांचे लसीकरण केले जाणार होते. मात्र शहरातील नागरिकांनी याठिकाणी गर्दी केल्याने गोंधळ उडाला. आरोग्य विभागाच्या नियोजन शुन्य कारभाराने हा सर्व गोंधळ उडत असून हे लसीकरण केंद्रच कोरोनासाठी सुपर स्प्रेडर बनत आहे. आधीच रुग्ण संख्या वाढत असताना नागरिकांनी याठिकाणी केलेली गर्दी चिंता वाढवणारी आहे. विशेष म्हणजे याठिकाणी ज्येष्ठ नागरिक मोठ्या प्रमाणात आले आहेत. ग्रामीण भागातील नागरिकांचे लसीकरण केले जाणार हे माहीत असताना देखील आरोग्य विभागाने कोणतेही नियोजन केले नाही.