Bid

?Crime Diary… बापरे..!आठ जणांशी बनावट विवाह करून खंडणी उकळली…महिलेसह पुरुष अटकेत..

? बापरे..!आठ जणांशी बनावट विवाह करून खंडणी उकळली…महिलेसह पुरुष अटकेत..

बीड : बनावट विवाह करून बलात्कार केल्याचा खोटा गुन्हा दाखल करेल अशी धमकी देत खंडणी वसूल करणाऱ्या महिलेसह एका पुरूषास आष्टी पोलिसांनी रंगेहाथ पकडून अटक केली.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आष्टी तालुक्यातील शिराळ येथील एका तरूणासोबत 9 मार्च रोजी एका महिलेने विवाह केला. मला दोन लाख रूपये दे, नसता मला फसवून आणून बलात्कार केल्याचा खोटा गुन्हा दाखल करेल, अशी धमकी देत तरूणाकडे खंडणीची मागणी केली. आपली फसवणूक झाली असल्याचे लक्षात येताच संबंधित तरूणाने आष्टी पोलिसात धाव घेतली. पोलिसांनी सापळा रचून खंडणी वसूल करताना महिलेस रंगेहाथ पकडून पर्दाफाश केला आहे.
आष्टीचे पोलीस निरीक्षक सलीम चाऊस यांनी तक्रारीची शहानिशा करून सापळा रचून कारवाई केली. यावेळी एक महिला व पुरूष यांनी तक्रारदार युवक यांच्याकडून मागणी केल्याप्रमाणे रोख रक्कम 50 हजार रूपये शासकीय पंचासमक्ष स्वीकारली. सदर आरोपींकडे चौकशी केली असता त्यांनी यापूर्वी सात ते आठ युवकांसोबत लग्न लावून त्यांना खोट्या तक्रारी धमक्या देवून त्यांच्याकडून पैसे उकळले असल्याचे निष्पन्न झाले. या प्रकरणी तक्रारदाराच्या जबाबावरून आष्टी पोलिसात गुन्हा दाखल करून दोन्ही आरोपींना ताब्यात घेतले आहे.
पोलीस अधीक्षक आर.राजा, अपर पोलीस अधीक्षक सुनिल लांजेवार, उपविभागीय पोलीस अधिकारी विजय लगारे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सलिम चाऊस, पो. उप. नि. प्रमोद काळे, स. फौ. अरूण कांबळे, पो. ह. बन्सी जायभाये, संतोष क्षीरसागर, पो. शि. प्रदीप पिंपळे, सचिन कोळेकर, स्वाती मुंडे, शिवप्रकाश तवले, रियाज पठाण यांनी केली.
प्राथमिक चौकशीत महिलेने तब्बल आठ जणांशी विवाह करून खंडणी वसूल केल्याचे समोर आले आहे. यामागे मोठे रॅकेट असल्याचा पोलिसांचा अंदाज आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button