Kolhapur

कोल्हापूरात पश्चिम महाराष्ट्रात प्रथमच आनुवंशिक विकारांचे निदान करणारे शिबीर उत्साहात, जागतिक महिला दिनानिमित्त महालक्ष्मी सखी मंच – समवेदना मेडिकल फौंडेशन – हिंद लॅब – नंदादीप नेत्रालयाचा उपक्रम .

कोल्हापूरात पश्चिम महाराष्ट्रात प्रथमच आनुवंशिक विकारांचे निदान करणारे शिबीर उत्साहात, जागतिक महिला दिनानिमित्त महालक्ष्मी सखी मंच – समवेदना मेडिकल फौंडेशन – हिंद लॅब – नंदादीप नेत्रालयाचा उपक्रम .

आनिल पाटील कोल्हापूर

कोल्हापूर : महिलांनी स्वतःच्या हक्कासाठी दिलेल्या लढ्याच्या स्मरणार्थ दरवर्षी, ८ मार्च हा दिवस जागतिक महिला दिन म्हणून साजरा करण्यात येतो. यंदा कोरोनाच सावट असतानाही सोशल डिस्टन्सिंग पाळून अनेक ठीकाणी महीला दीन साजरा करण्यात आले.
थायरॉईड, रक्तघटक तपासणीसह अनुवंशिक विकारांचे निदान करणाऱ्या इलेक्टरोफेरोसिस चाचण्या आणि नेत्र तपासणी शिबिराचा पश्चिम महाराष्ट्रातील पहिलाच मोफत उपक्रम जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून कोल्हापुरात राबविण्यात आला. महालक्ष्मी सखी मंचच्या पुढाकाराने समवेदना मेडीकल फौंडेशन , हिंद लॅब आणि नंदादीप नेत्रालय यांच्या संयुक्त सहभागाने साईक्स एक्सटेन्शन परिसरात हा उपक्रम झाला. आडीचशेहून अधिक महिला भगिनींनी या उपक्रमाचा लाभ घेतला. भारतीय जनता पार्टीचे जिल्हा सरचिटणीस विजय जाधव , महिला आघाडी जिल्हाध्यक्षा कु. गायत्री राऊत , पाककलातज्ञ सौ.संगीता देवकर , हाजी अब्दूलमजिद जमादार ,सौ.हाजी दिलशाद जमादार , सामाजिक कार्यकर्ते संजय पटकारे यांच्या प्रमुख उपस्थितीत या शिबिराचा शुभारंभ झाला. महालक्ष्मी सखी मंचच्या अध्यक्षा सौ. जस्मिन जमादार , सामाजिक कार्यकर्ते आजम जमादार , झाकिरभाई जमादार, समवेदना फौंडेशनचे संस्थापक अध्यक्ष बरकत पन्हाळकर,नंदादीप नेत्रालयाचे डॉ. शुभम चव्हाण ,महालॅबचे तुषार पाटील आणि सुरेश पाटील आणि श्रीमती छाया साळुंखे , दिपाली समुद्रे , स्मिता गायकवाड, रेखा राजगुरू , एजाज शिकलगार, युवराज पाटील , आय्याज शेख , नवाब शेख, युसूफ जमादार, नजीर जमादार,मुस्कान जमादार, सौ.आरिफा जमादार , सौ.सफूरा जमादार ,सौ.तरन्नुम जमादार यांनी या उपक्रमासाठी परिश्रम घेतले.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button