Chalisgaon

पाणीदार ब्राम्हणशेवगे गावाची आदर्श गावाकडे वाटचाल : तालुका स्तरिय स्मार्ट ग्राम म्हणून निवड जाहीर : दहा लाखाचे मिळणार बक्षीस…

पाणीदार ब्राम्हणशेवगे गावाची आदर्श गावाकडे वाटचाल : तालुका स्तरिय स्मार्ट ग्राम म्हणून निवड जाहीर : दहा लाखाचे मिळणार बक्षीस…

चाळीसगाव : गावातील राजकिय गट- तट बाजुला ठेवून गावाने विकासाचा ध्यास घेतला तर नक्कीच गाव आदर्श होऊ शकते.हे आपण पाहिले आहे असेच तालुक्यापासून १७ कि.मी.अंतरावर असलेले ब्राम्हणशेवगे हे गाव. चाळीसगाव तालुक्यातील अल्पावधीतच जलसंधारण, पर्यावरण रक्षण, सामाजिक,शैक्षणिक, राजकीय क्षेत्रात नावारूपाला आलेले गाव म्हणजे ब्राम्हणशेवगे. राजकिय कुठलाही वारसा अनुभव नसतानाही गावाने आपल्यावर विश्वास टाकला आपण गावाचे काहीतरी देणं लागतो या उद्दात भावनेने निस्वार्थ पणे सेवा करण्याची भावना मनात ठेवून गाव विकास डोळ्यासमोर ठेवला तर गावाचे चित्र बदलू शकते.हे सिद्ध केले आहे. सरपंच सौ.आशा माळी व त्याच्या ग्रामपंचायत सदस्य सहकार्यानी. या गावाची सन २०११ च्या जनगणनेनुसार ३३०३ लोकसंख्या,क्षेत्रफळ जवळपास २००० हेक्टर. संपुर्ण गाव शेती व्यवसायावर अवलंबुन. कपाशी हे मुख्य पिक त्याचबरोबर,मका,ज्वारी, बाजरी इ.पिकाचे मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतले जाते आता शेतीला जोड़ व्यवसाय म्हणून दुग्ध व्यवसायाकडेही पाहिले जात आहे.काही वर्षांपूर्वी दुष्काळग्रस्त गाव म्हणून ओळख असणारे गाव. नेहमीच पिण्याच्या पाण्यासाठी तहानलेले गाव.पाण्याचे नियोजन नसल्यामुळे उशाशी असलेले धरण पाटचारीत पाणी सोडावे लागत असल्यामुळे डिसेंबर ते जानेवारीतच कोरडे ठाक होत होते. मग कडक उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्यासाठी दाही दिशा भटकंती करायची अशी परिस्थिती होती. कधी मन्याड धरणाचे तर कधी चाळीसगाव येथून आणावे लागले होते.ही परिस्थिती सरपंच सौ.आशा नाना माळी व ग्रामपंचायत सदस्य याचे मार्गदर्शनाखाली लोकसंघर्ष मोर्चाचे प्रसिद्धी प्रमुख सोमनाथ माळी यानी नियोजन पुर्वक हाताळणी करत. पाझर तलावाचे गेट बंद करून वाया जाणारे पाण्याचे माध्यमातून जवळपास दोनशे ते अडीचशे हेक्टर क्षेत्रातील शेतजमिनी ओलिताखाली आणणे शक्य झाले. तसेच विकास कामाना सुरवात करताना संपुर्ण गावात असलेल्या उघड्या गटारी,सफाई कर्मचारीचा अभाव, त्यामुळे होणारी दुर्गधी, घाणीचे साम्राज्य, साथीच्या आजाराना आळा घालता यावा यासाठी १४ वा वित्त आयोग निधीतून बंदिस्त गटारी करण्यात येऊन गावाचे मुख्य चौक गाव दरवाजा, गणपती मंदिर, जि.प.शाळा,ग्रामपंचायत परिसर,अंगणवाडी,बसस्थानक परिसरापर्यत पेव्हरब्लाक बसवण्यात आले.तसेच नागरिकाना वैयक्तिक शौचालय लाभ देऊन त्याचा वापर करण्यासाठी जनजागृती करण्यात येऊन गाव स्वच्छ व सुंदर करण्याचा प्रयत्न केला.,तसेच गावात ठिकठिकाणी झाडे लागवड केली तसेच जतनही केली.पिण्याचे पाणी व शेतीसाठीचे पाणी नियोजन केले.जलयुक्त शिवार अभियान योजना प्रभावी पणे राबवून घेतल्याने १२ सीमेंट नाले व ५ माती नाले बाध खोलीकरण करण्यात आले.तसेच गावाने सन २०१९ च्या पानी फाउंडेशन सत्यमेव जयते वाटर कप स्पर्धेत सहभागी होऊन पाणी बचतीचे उपक्रम हाती घेऊन नाईकनगर व गावामध्ये काही ठिकाणी लोकसहभागातून शोषखड्डे करून घेतली.त्याचबरोबर ईडीचे उपायुक्त उज्वल कुमार चव्हाण, गुणवंत सोनवणे आमदार मंगेश चव्हाण यांच्या प्रेरणेने शिवनेरी फाउंडेशन संचलित भुजल अभियान मिशन पाचशे कोटी लिटर जलसाठा अभियान राबवत गाव शिवारात कोरोनाच्या बिकट परिस्थितित लाकडाऊन असताना जलसंधारणाची कामे लोकसहभागातून रोटरी क्लब व सेवा सहयोग संस्थेच्या माध्यमातून मिळालेल्या पोकलॅन्ड मशिनच्या माध्यमातून तीस मातीबाध खोलीकरण व रूदीकरण करण्यात आले तसेच धामणी नदी गाळमुक्त करण्यात येऊन यामाध्यमातून खोलीकरण व रूदीकरण करण्याच्या कामातून १लाख चाळीस हजार घनमीटर काम झाल्याने याकामातून चक्क चौदा कोटी लिटर जलसाठा एकाच पावसात तयार झाला.यासाठी सव्वा सहा लाख रुपये लोकसहभाग शेतकरी बांधवानी टाकला.या बरोबरच शेतकरी बांधवानी दिड किमी शिवार रस्तेही तयार करण्याचे काम केले. या सर्व कामाची दखल तालुक्याचे आमदार मंगेश चव्हाण याचे शिवनेरी फाउंडेशन तर्फे राबवण्यात आलेल्या तालुकास्तरीय स्पर्धेत ही गावाला तालुक्यातील दुसरे क्रमाकाचे एक लाख एक हजार रुपये रोख व सात लाखाची जलसंधारणाची कामे करण्यासाठी बक्षीस मिळाले आहे. गावास महात्मा गांधी तंटामुक्त गाव म्हणूनही तीन लाखाचा पुरस्कारही यापूर्वी मिळालेला आहे.
आणि आता २०१८-१९ दहा लाख रुपये तालुकास्तरीय स्मार्टग्राम पुरस्कारासाठीही ग्रामपंचायतीची निवड नुकतीच जाहिर झाली आहे.सुदर गाव अभियानात सन २०१८-१९ वर्षासाठी तालुका पातळीवर प्रथम क्रमांक मिळवत दहा लाख रुपये बक्षीसास पात्र ठरली आहे.१० फेब्रुवारी रोजी तपासणी पथक तालुक्यात आले होते या स्पर्धेचे निकष एस(स्वच्छता),एम(मैनेजमेंट),ए(दायित्व),आर(पारंपरिक ऊर्जा,पर्यावरण),टी(पारदर्शक तंत्रज्ञान) होते. या निकषांवर तपासणी समितीतर्फे ग्रामपंचायतीची निवड जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे गाव दुष्काळमुक्त व पाणीदार झाले आहे.स्वच्छ, सुंदर सुजलाम सुफलाम व स्वयंपुर्ण,ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध होऊन गाव आदर्श गावाकडे वाटचाल करत आहे.
संकलन
सोमनाथ माळी
सोशल मीडिया महामित्र
महाराष्ट्र शासन

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button