Chalisgaon

का अशा शाळेला आयएसओ मानांकन मिळणार नाही ? सेवा सहयोग संस्थेचे गुणवंत सोनवणे यांचे प्रतिपाद

का अशा शाळेला आयएसओ मानांकन मिळणार नाही ? सेवा सहयोग संस्थेचे गुणवंत सोनवणे यांचे प्रतिपाद

सोमनाथ माळी चाळीसगाव

चाळीसगाव : चाळीसगाव तालुक्यातील गिरणानदी परिसरातील गाव म्हणजे पिंपळवाड म्हाळसा.
म्हाळसा देवीच्या नावावरून गावाचे नाव पिंपळवाड म्हाळसा. तालुक्यातील आयएसओ शाळेचा मान या गावातील प्राथमिक शाळेला मिळाला आहे.काय वेगळेपण असते बरं अशा शाळांचे किंवा गावाचे ?.गेल्या महिन्यात आम्ही चाळीसगाव तालुक्यातील शाळांना सेवा सहयोग संस्थे मार्फत शाळा डिजिटल करण्यासाठी संगणक लागणार असतील तर त्या शाळांनी फॉर्म भरून द्यावेत असे आव्हान केले होते यात अट मात्र अशी की संस्था साहित्य मोफत उपलब्ध न करून देता अतिशय माफक दरात(२९५०₹) शाळेला प्रत्येक ५० विद्यार्थ्यांच्या मागे १ असे संगणक संच उपलब्ध करून देईल.
मोफत न देण्यामागचा सर्वात महत्वाचा उद्देश म्हणजे दिलेल्या गोष्टीचे फार महत्व नसते , व भविष्यात त्या वस्तूला लागणारा खर्च, मेंटेनन्स वेळेवर न केल्यामुळे वस्तू बंद पडतात म्हणून जी शाळा पैसे देवून संगणक संच घेण्यास तयार होईल ती शाळा याचा विद्यार्थ्यांसाठी नक्की उपयोग करेल असा आमचा अनुभव.
पुष्पा ताई बागुल या संदर्भात शाळांना, शिक्षकांना आव्हान करत होते, त्या वेळेस दहिवद गावाचे माहेरअसलेल्या
सीमा बोरसे या पिंपळवाड म्हाळसा शाळेत शाळेच्या शिक्षिका यांच्या सोबत संपर्क झाला, त्यांनी आमच्या शाळेसाठी संगणक संच उपलब्ध करून द्यावे म्हणून मागणी केली आणि त्यासाठी आम्ही वर्गणी जमा करू असे त्या म्हटल्या. विद्यार्थी संख्येनुसार त्यांना ५ संगणक संच देता येणे शक्य होते, मात्र त्यांनी १० ची मागणी केली.. न राहवून पुष्पा ताई यांनी विचारणा केली की एवढी रक्कम जमा होईल का?
त्यावर त्यांनी दिलेले उत्तर जेव्हा ऐकले तेव्हा अशा शिक्षकांबद्दल खरच मनापासून आदर निर्माण होतो मी माझ्या शाळेसाठी , शाळेच्या मुलांसाठी पदराची झोळी करेल,घरोघरी जावून वर्गणी मागेल आणि २ दिवसात संगणकासाठी पैसा उभे करेल संस्थेला या शिक्षकाची माहिती दिली आणि त्यांनी ही १० संगणक संच देता येतील म्हणून होकार कळवला.
गाव करी ते राव काय करी त्यांनी हा विषय गावाच्या सरपंचाच्या ,शिक्षण समितीच्या कानावर घातला आणि बसल्या जागेवर त्यांनी स्वतः वर्गणी जमा केली आणि ,१० संगणकाचा निधी उभा केला..अशा सरपंचाचे, शिक्षण समिती चे कौतुक वाटते. बऱ्याच शाळांना आम्ही आव्हान केल्या नंतर फक्त काहीच शाळा पुढे आल्या, का असे घडते ?
जेव्हा एखादा शिक्षक शाळेसाठी गावात वर्गणी मागण्यासाठी फिरू शकतो, जेव्हा त्या गावाचा सरपंच शाळेसाठी ३ मिनिटात ३ लाख रुपये देखील उभे करू असे सांगतो, त्यावेळेस अशा शाळा आयएसओ मानांकन प्राप्त करत असतात. आणि असे असल्यावर का विद्यार्थी घडणार नाहीत. आपल्या शाळांमध्ये देखील आदर्श शिक्षक आहेत फक्त त्यांना आपल्या सर्वांच्या सहकार्याची गरज असते मी फक्त एक निमित्त मात्र, यासाठी सेवा सहयोग संस्थेचे ज्यांनी हे संगणक उपलब्ध करून दिले गावाचे सरपंच श्रीयुत भाऊसाहेब प्रल्हाद पाटील ,ग्रामसेवक श्री विलास विठ्ठल महाले सर्व ग्रामपंचायत सदस्य व सदस्या,शालेय व्यवस्थापन समिती
अध्यक्ष श्री नाना दत्तू माळी
शिक्षण तज्ञ-श्री .के डी.देवकर.
श्री. राहुल देशमुख आणि सर्व SMC सदस्य, शिक्षक बंधू श्री कमलेश बोरसे आणि श्री मुख्याध्यापक सर्व शिक्षक बंधू भगिनी यांच्या सर्व एकीचे कौतुक व आभार मानावे तेवढे थोडेच आहेत.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button