Chalisgaon

सोमनाथ माळी जलयोध्दा पुरस्काराने सन्मानित…

सोमनाथ माळी जलयोध्दा पुरस्काराने सन्मानित…

प्रतिनिधी : नितीन माळे चाळीसगाव

चाळीसगाव : ब्राम्हणशेवगे ता.चाळीसगाव येथील सामाजिक कार्यकर्ते लोकसंघर्ष मोर्चाचे प्रसिद्धी प्रमुख सोमनाथ माळी यांचा नुकताच चाळीसगाव येथे झालेल्या खांन्देशस्तरीय जलसंमेलनात जलयोध्दा म्हणून चाळीसगाव चे लाडके आमदार मंगेशदादा चव्हाण यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.
मागील पाच वर्षापासून ते आपले ब्राम्हणशेवगे गाव व चाळीसगाव तालुका दुष्काळ मुक्त करण्यासाठी गाव पाणीदार करण्यासाठी सातत्याने जलचळवळीत सक्रिय सहभागी आहेत. पानी फाऊंडेशनच्या सत्यजमेव जयते वाँटर कप स्पर्धेतही सहभागी होऊन मोठ्या प्रमाणात जलसंधारणाचे काम उभे केले आहे. तसेच मागील वर्षी आमदार मंगेशदादा चव्हाण, उज्ज्वल कुमार चव्हाण व गुणवंत सोनवणे यांच्या शिवनेरी फाऊंडेशन संचलित भुजल अभियान मिशन पाचशे कोटी लिटर जलसाठा अभियान स्पर्धेत सहभागी होऊन ब्राम्हणशेवगे येथे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लाँकडाऊन असतांना रोटरी क्लब व सेवा सहयोग संस्था तर्फे मिळालेल्या पोकलँंड मशिनच्या माध्यमातून दि.17 एप्रिल 2020 ते 10जून 2020 या छप्पन दिवसात एकलाख चाळीस हजार घनमीटर काम उभे करून पहील्याच पावसात चौदा कोटी लिटर जलसाठा निर्माण केला आहे.या कामातून तीस माती बांध खोलीकरण करण्यात आले असून ते ओव्हरफ्लो झाले असून शिवारातील पाचशे हेक्टर क्षेत्र ओलीताखाली आले आहे. शेती पिकांबरोबरच काही शेतकरी मस्त्यव्यवसायाकडेही वळलेले आहे.या जलसंधारणाच्या कामामुळे ब्राम्हणशेवगे गावाला तालुक्यातील दुसऱ्या क्रमांकाचे एकलाख एकहजार रुपयाचे बक्षीसही मिळाले आहे.
यापूर्वीही जलसंधारण व पर्यावरण क्षेत्रातील भरीव कार्याबद्दल राज्यस्तरीय पर्यावरण रत्न पुरस्कार,राज्यस्तरीय निसर्ग दूत हरियाली ग्रीन मँन अवाँर्ड,समाज चेतना पुरस्कार मिळाले आहेत.
चाळीसगाव येथे नुकतेच खांन्देशस्तरीय जलसंमेलन संपन्न झाले याप्रसंगी आमदार मंगेशदादा चव्हाण यांच्या हस्ते जलयोध्दा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले आहे.
त्यांचे हा पुरस्कार मिळाल्याबद्दल मित्रपरिवारातर्फे अभिनंदन होत आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button