Chalisgaon

मिशन पाचशे कोटी लिटर जलसाठा अभियान: दुसर्या पर्वास सुरुवात :कार्यशाळा संपन्न…

मिशन पाचशे कोटी लिटर जलसाठा अभियान: दुसर्या पर्वास सुरुवात :कार्यशाळा संपन्न…

सोमनाथ माळी

चाळीसगाव जि.जळगाव चाळीसगाव तालुक्यात मागील वर्षी सोळा गावात मिशन पाचशे कोटी लिटर जलसाठा अभियानाअंतर्गत एकशे दोन कोटी लिटर जलसाठा निर्माण झाला आहे. पुढील वर्षी या कामाची व्याप्ती वाढवली जात असुन शंभर गावात नाला खोलीकरण व रुंदीकरण कामांचे नियोजन करण्यात आले आहे. ह्या कामात तांत्रिकता असावी मागील वर्षाप्रमाणे महिण्याच्या तिसऱ्या रविवारी ईडीचे सह आयुक्त उज्ज्वल कुमार चव्हाण मुंबई येथून येऊन येथील केमिस्ट भवनात पाचपाटील टिमला तांत्रिक मार्गदर्शन व्हावे यासाठी कार्यशाळा घेतात.या कार्यशाळेत व्यक्तिमत्त्व विकास व स्वतावर काम कसे करावे.

यानुसार केमिस्ट्री भवनात कार्यशाळा संपन्न झाली. याप्रसंगी पाचपाटील टिमचे प्रा.तुषार निकम, आर.एम.पाटील, एम.डी.देशमुख,शशांक अहिरे,सविता राजपूत, हेमंत मालपुरे, एकनाथ माळदकर, पंकज पवार,सोमनाथ माळी,प्रशांत गायकवाड,किरण पाटील, सुचित्रा पाटील,रंजना पाटील,तुकाराम पाटील,धनंजय मांडोळे,मिलिंद देवकर आदी उपस्थित होते.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button