Chalisgaon

महाराणा प्रताप चौक ते हॉटेल विराम बायपास पर्यंतच्या रस्त्याने घेतला मोकळा श्वास…

महाराणा प्रताप चौक ते हॉटेल विराम बायपास पर्यंतच्या रस्त्याने घेतला मोकळा श्वास…
वाढलेल्या झाडं – झुडपांमुळे रहदारीला होणाऱ्या अडथळ्यामुळे त्रस्त नागरिकांच्या तक्रारीची आमदार मंगेशदादा चव्हाण यांनी घेतली दखल…

नितीन माळे

चाळीसगाव – शहराच्या मुख्य भागातून राष्ट्रीय महामार्ग क्र.२११ जातो यातील महाराणा प्रताप चौक (कॉलेज पॉईंट) ते धुळे रोड बायपास (हॉटेल विराम) पर्यंतच्या रस्त्याच्या आजूबाजूला झाड – झुडपे वाढल्याने मोठ्या प्रमाणात अपघात होत होते. या भागात वाहनांची वर्दळ देखील जास्त असल्याने याचा त्रास प्रवाश्यांना होत होता. यानुषंगाने धुळे रोड येथील रहिवासी प्रा.आर. पी.चोपडा, मनोज सोनवणे व के बी. पाटील सर यांनी आमदार मंगेशदादा चव्हाण यांच्या जनसेवा कार्यालयात तक्रार केली असता आमदार चव्हाण यांनी तात्काळ राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण व नगरपालिकेला सदर रस्त्यालगत असलेली निरुपयोगी झाडे -झुडुपे तात्काळ काढण्यात यावी अश्या लेखी सूचना दिल्या होत्या. आमदार मंगेशदादा चव्हाण यांच्या सूचनांची दखल घेत राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या वतीने महाराणा प्रताप चौक (कॉलेज पॉईंट) ते धुळे रोड बायपास (हॉटेल विराम) पर्यंतच्या निरुपयोगी व रहदारीस अडथळा निर्माण करणाऱ्या झाड – झुडप जेसीबीच्या साहाय्याने काढण्यास सुरुवात करण्यात आली. यामुळे या रस्त्याने मोकळा श्वास घेतला असून नागरिकांच्या समस्यांची तात्काळ दखल, त्याचा सुयोग्य पाठपुरावा आमदार मंगेशदादा चव्हाण यांच्या जनसेवा कार्यालयामार्फत घेतला जात असल्याने तक्रारदार यांनी समाधान व्यक्त केले.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button