?️ Big Breaking..
अमळनेर शहर व अमळनेर तालुक्यातील नागरिकांनो कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी पुढाकार घ्या.. पोलीस निरीक्षक अंबादास मोरे
नूरखान
मित्रानो दिनांक ०५-०८-२०२० रोजी श्रीराम जन्मभूमी अयोध्या येथे श्रीराम मंदिराचे भूमिपूजन समारंभ आयोजित करण्यात आला आहे.
राममंदिर हा समस्त हिंदू धर्मा चा आस्थेचा विषय आहे. हिंदू धर्म हा शांततेचा, समतेची, बंधुत्वाची, न्यायाची शिकवण देणारा धर्म आहे.
सध्या संपूर्ण जग हे करोना नावाच्या जागतिक महामारी सोबत एकजूट होवून लढा देत आहे.
या लढ्यात सर्व मानव जात धर्म ,वंश,आपसातील मतभेद विसरून एकत्र येऊन लढत आहे. आपण करोना विरोधात एकजूट दाखवली नाही तर कदाचित करोना पुढील काळात आपला नायनाट करेल यात शंका नाही. या महामारी सोबत लढण्यासाठी मा जिल्हाधिकारी साहेबांनी फौजदारी प्रक्रिया संहिता कलम १४४ आदेशाने विनामस्क फिरणे, कोणतेही धार्मिक, सामाजिक, उत्सव करिता एकत्र येऊन करण्यास मनाई केली आहे…
अत्यावश्यक बाबी खेरीच विनाकारण प्रवास, फिरणे, बाहेरगावी जाणे याला देखील बंदी घालण्यात आली आहे…
सार्वजनिक वाचनालय, व्यायामशाळा येथे नागरिकांना प्रवेश बंद केला आहे…
तसेच
मंदिरे, मशिदी, दर्गा, गुरूद्वारा,चर्च येथे कोणत्याही धार्मिक प्रयोजन करिता नागरिकांना एकत्र येऊन आरती, पूजा अर्चना ई बंदी घालण्यात आली आहे..
तरी आपण सर्व कायदाचा सन्मान करणारे प्रभू रामचंद्र यांचे भक्तांना मी पोलीस निरीक्षक अंबादास मोरे अमळनेर पोलीस स्टेशन प्रशासनाकडून विनंती करतो की दिनांक ०५-०८-२०२० रोजी खालील बाबी टाळाव्यात…
१) दोन जाती जमाती धर्म यात वैर निर्माण होईल असे कोणतेही लिखाण, चित्र what’s up वर शेअर करू नये..
२) आनंद उत्सव साजरा करताना फटाके, ढोल, लाऊस्पिकर उपयोग करू नये
३) सार्वजनिक मंदिर , सभागृह, चौक येथे आरती व धार्मिक कार्यक्रम आयोजन करण्यात येवू नये
४) शक्यतो कामाव्यतिरिक्त घराबाहेर पाडण्याचे टाळावे..
५) व्हॉट्स ऍप , फेस बुक , सोशल मीडिया माध्यमातून कोणतीही आक्षेपार्ह मजकूर, फोटो, व्हिडिओ प्रसारित झाल्यास त्यास ग्रुप अडमिन प्रथमतः जबाबदार धरण्यात येईल, तरी वरील बाबी टाळण्याकरिता करिता दिनांक ०५-८-२०२० रोजी ग्रुप अडामिन ने ग्रुप admin only mode वर setting करावी.
वरील सूचना चे सर्वांनी अत्यंत काटेकोर पणे पालन करावयाचे आहे . वरील सूचना कडे दुर्लक्ष करून वरील कारणाने कायदा व सुव्यवस्था प्रश्न निर्माण झाल्यास संबंधित विरोधात भादवी क १८८, २९५ अ ,१५३, २६८, २७२ प्रमाणे कारवाई करण्यात येईल…असे आवाहन अमळनेर पोलीस निरीक्षक अंबादास मोरे यांनी केले आहे.






