हातले धरणाजवळ भिल्ल समाजाच्या दांपत्याचा निर्घुण खून
चाळीसगाव प्रतिनीधी मनोज भोसले
मनोज भोसले चाळीसगाव तालुक्यातील हातले व वाघले धरणाच्या दरम्यान भिल्ल समाजाच्या दांपत्याचा निर्घुण खून झाल्याची घटना उघडकीस आली घटनास्थळी पोलीस पोलीस दाखल झाले आहेत.
प्राप्त माहितीनुसार भिल्ल समाजाचे हे दांपत्य धरणाजवळ झोपडी करून राहत होते. काल रात्रीच्या सुमारास अज्ञातांनी त्यांच्यावर हल्ला करून दोन्हींना ठार केले. पत्नीचा मृतदेह झोपडीत आढळला तर पतीचा मृतदेह घटनास्थळापासून 50 फूट अंतरावर आढळून आला. या घटनेत मारेकऱ्यांनी कुऱ्हाडीसारख्या धारदार शस्त्राचा वापर केल्याचे दिसून येत आहे. नेमका हे खून कशामुळे झाले, हे अद्याप समजू शकले नाही, पोलीस पुढील तपास करीत आहेत.






