Nanded

घरी बसून 18 तास अभ्यास उपक्रमातून महामानवास केले अभिवादन..डॉ.राहुल कांबळे यांच्या आव्हानाला महाराष्ट्रातून चांगला प्रतिसाद

घरी बसून 18 तास अभ्यास उपक्रमातून महामानवास केले अभिवादन

डॉ.राहुल कांबळे यांच्या आव्हानाला महाराष्ट्रातून चांगला प्रतिसाद

नांदेड प्रतिनिधी/ वैभव घाटे

मुखेड तालुक्यातील सोशल मीडियाच्या माध्यमातून आपण आपल्या घरात बसून विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची 129वी जयंती निमित्त 18 तास अभ्यास उपक्रमास आयोजित करण्यात आले होते या उपक्रमामध्ये नांदेड जिल्ह्यातील व महाराष्ट्रातून पण चांगला प्रतिसाद मिळाला आहे अभ्यासाच्या माध्यमातून घरी बसून महामानवास केले अभिवादन 18 तास अभ्यास उपक्रमाचे संयोजक डॉ‌.राहुल कांबळे यांनी गेल्या सात वर्षापासून मुखेड तालुक्यातील विद्यार्थी विद्यार्थ्यांना 18 तास अभ्यास उपक्रमाचे आयोजन करतात त्यामध्ये अभ्यास कसा करायचा आपण किती तास बसू शकतो किती वेळ अभ्यास करू शकतो अभ्यासाचे नियोजन कसा असतं त्यांनी हे निरीक्षण करून जास्त अभ्यास करणाऱ्याला ते बक्षीस स्वरूपात जिल्हाअधिकारी तहसीलदार यांच्या हस्ते प्रमाणपत्र देतात त्यानिमित्ताने येथील विद्यार्थ्यांना अभ्यासाच्या वळण लागलेले आहे सध्या देशात कोरोनाव्हायरस ची सात चालू असल्यामुळे आणि संचारबंदी असल्यामुळे डॉ.राहुल कांबळे यांच्या सोशल मीडियाच्या माध्यमातून आपण आपल्या घरी बसून 18 तास अभ्यास करू शकता असे आव्हान केले त्या आव्हानाला महाराष्ट्रातून विद्यार्थ्यां विद्यार्थिनींनी सहभाग नोंदवला या उपक्रमामध्ये विद्यार्थी-विद्यार्थिनी शिक्षक शिक्षिका अधिकारी कर्मचारी नर्स डॉक्टर्स पोलीस अधिकारी व्यवसायदार कुटुंबातील थोर व्यक्ती या सर्वांनी उपक्रमात सहभाग नोंदवला आज सकाळी सहा वाजता या उपक्रमाला सुरुवात झाली डॉ‌.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण व बौद्ध वंदना घेऊन या उपक्रमाची सुरुवात करण्यात आली सोशल मीडियाच्या माध्यमातून व्हाट्सअप ग्रुप तयार करण्यात आला त्या ग्रुपवर तीन-तीन तासाला उपक्रमाला बसलेल्या सदस्याने फोटो टाकत राहिले हा एक वेगळा उपक्रम डॉ.राहुल कांबळे यांच्या प्रेरणेतून यशस्वी झाला आहे
आपण आपल्या घरात बसूनच
18 तास अभ्यास उपक्रमातून महाराष्ट्रातून युवक-युवतींनी सहभाग नोंदवून महामानवास अभिवादन केले
18 तास अभ्यास उपक्रम यशस्वी करण्यासाठी या कार्यक्रमाचे संयोजक डॉ.राहुल कांबळे पत्रकार भारत सोनकांबळे पत्रकार संदीप पिल्लेवाड प्रा.प्रकाश वाघमारे जयसिंग वाघमारे इत्यादी नी सहकार्य केले

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button