Chalisgaon

जनसेवा हीच ईश्वरसेवा, कठोर परिस्थतीत देखील आमदार कार्यालयातील जनसेवक देताय नागरिकांना प्रामाणिक सेवासुविधा…

जनसेवा हीच ईश्वरसेवा, कठोर परिस्थतीत देखील आमदार कार्यालयातील जनसेवक देताय नागरिकांना प्रामाणिक सेवासुविधा…

मनोज भोसले

जगाला सतावून सोडलेल्या कोरोनो संसर्गापासून आपल्या सर्वांचे रक्षण करण्यासाठी पोलिस प्रशासन, डॉक्टर नर्स व बाकी सर्वच कर्मचारी युद्धपातळीवर प्रयत्न करत आहेत या बरोबरच कोरोनाच्या वाढत्या फैलावाच्या पार्श्वभूमीवर राज्यात संचारबंदी लागु करण्यात आली आहे आपल्या तालुक्यात पण फक्त काही अत्यावश्यक सुविधा सुरू ठेवण्यात आल्या आहेत आशा परिस्थितीत मुंबई-पुणे सारख्या शहरात नोकरी व शिक्षणानिमित्त राहणाऱ्या ४०गाव तालुकावासीयांना गावाकडे येण्यास खूप अडचणीना सामोरे जावे लागत आहे ही बाब लक्षात घेऊन आमदार मंगेशदादा चव्हाण यांनी बाहेरगावी अडकलेल्या लोकांना एक मदतीचा हात दाखवला त्यासाठी ते काही दिवसांपासून आपल्या कार्यालयातून आशा अवस्थेत अडकलेल्या लोकांना विनंती व शिफारस पत्र देत आहेत जेणेकरून प्रवासकरतेवेळी कुठेही प्रशासन त्रास देत नाही व घरी सुखरुप येण्यास सहकार्य करीत आहेत..

*या बरोबरच अत्यंत कडक अशा वातावरणात देखील #आमदारमंगेशदादाचव्हाण यांचे शहरातील ‘#अंत्योदय जनसेवा कार्यालय’ लोकांच्या अत्यावश्यक सेवेसाठी सुरू करण्यात येते, येथील कर्मचारी दिपक पाटील व शुभम पाटील यांना कोणीही मदतीसाठी संपर्क केला असता ते परिस्थीचे गांभीर्य लक्षात घेऊन कुठलाही विचार न करता लोकांच्या सेवेसाठी कार्यालयात हजर होतात व जास्त गर्दी न होऊ देता ठराविक अंतर ठेवून नियमांचे पालन करत आपल्याने होईल तेवढे सहकार्य करत असतात.. तालुक्याचे लोकप्रिय आमदार मंगेशदादा चव्हाण यांच्या जनसेवा कार्यालयाच्या ‘अंत्योदय’ नावाप्रमाणेच येथील कर्मचारी मदतपूर्ण भावनेतून कुठलाही भेद-भाव न करता,लहान-मोठेपणा,गरीब-श्रीमंत या गोष्टी न बघता समाजातील प्रत्येक घटकापर्यंत सेवा देण्यास तत्पर असतात..

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button