Chalisgaon

खासदार उन्मेश दादा पाटील यांच्या प्रयत्नातून मुंबईतील “”सी लिंकची”” आठवण देणारा पूल चाळीसगावात साकारला जातोय नॅनो रिव्हर लिंक पूल

खासदार उन्मेश दादा पाटील यांच्या प्रयत्नातून मुंबईतील “”सी लिंकची”” आठवण देणारा पूल चाळीसगावात साकारला जातोय नॅनो रिव्हर लिंक पूल

खासदार उन्मेश दादांच्या दुरदृष्टीतून शहरवासीयांसह हजारो विद्यार्थ्यांची गैरसोय दूर होणार

नितीन माळे

चाळीसगाव — कधीकाळी शिवाजी घाटातून स्वामीनारायण मंदिराजवळून मोठया प्रमाणात येजा होत असायची. थेट पाटणादेवी रोड पासून रांजणगाव दरवाज्यातुन सदर बाजारामार्गे शिवाजी घाटातून स्वामी नारायण मंदीरावरून ए बी हायस्कुल मध्ये हजारो नागरीक विदयार्थी या नदीपात्रातून जात असत. असे म्हटले जायचे की शहरातून वाहणारी नदी गावाच्या विकासात भर घालणारी वरदान ठरते. तितुर व डोंगरी नदीच्या संगमातून सत्तर ते ऐंशीच्या दशकापर्यंत ही नदी शहरातून खळखळून वाहत होती.अरुंद पात्रात गावातील गुरेढोरे यांची तहान भागवित शहराच्या सौंदर्यात भर घालीत होती. कालांतराने गावलगतची वस्ती वाढली तशी शहरातील घाण नदीपात्रात आणून फेकणाऱ्यांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढले त्यातच अतिक्रमणांनी पात्र अरुंद होत गेले पर्यायाने नदीतुन वाहणारे पाणी थांबले अस्वच्छ झाले. या घाण पाण्यातून पैलतीरी जाण्याचा मार्गही बंद झाला.

सुमारे पस्तीस चाळीस वर्षांपूर्वी या सपाट नदीपात्रातून गुडघाभर पाण्यातून शाळेत जाणारी मुले असो वा सायकल अथवा बैलगाडी घेवून जाणारे नागरिक असो हे चित्र आज वयाची पन्नाशीत असणाऱ्या शहरवासीयांच्या मनात अजून ही ठळकपणे असेल यात शंका नाही.मात्र या नदीपात्रातून पुन्हा पलीकडे जाण्याचा मार्ग निर्माण केला जाऊ शकतो हा विचार आजवर एकाही लोकप्रतीनीधीच्या मनाला शिवला नाही.ही वस्तुस्थिती आहे.हा सदैव वापरातील मार्ग पुन्हा एकदा सुरू करण्याचे भाग्य तत्कालीन आमदार आणि विद्यमान खासदार उन्मेश दादांच्या भविष्यवेधी नजरेतून पुन्हा एकदा साकारणार आहे.माझ्या बाळगोपाळ विदयार्थी तसेच जेष्ठांसह सुमारे पंधरा ते पंचवीस हजारापेक्षा अधिक शहरवासीयांची लांब फेऱ्यातून वापरण्याची गैरसोय दूर होणार असून खासदार उन्मेश दादा पाटील यांच्या प्रयत्नातून मुंबई सी लिंकची आठवण देणारा पूल चाळीसगावात साकारला जातोय. प्रगतीपथावर सुरू असलेला नॅनो रिव्हर लिंक पूल आपल्या सेवेत थोड्याच दिवसात सुरू होईल या पुलाची पाहणी नुकतीच खासदार उन्मेश दादा पाटील यांनी केली.त्यांच्या प्रयत्नातून साकारल्या जाणाऱ्या पुलामुळे जुन्या आठवणीना उजाळा मिळणार असल्याने परिसरातील नागरीकांनी याप्रसंगी केंद्रीय पेट्रोलियम प्राकृतिक गॅस व सुक्ष्म लघु मध्यम उद्योग मंत्रालयाचे स्टँडिंग कमेटी सदस्य खासदार उन्मेश दादा यांना भेटून आभार व्यक्त केले आहे.याप्रसंगी नगरसेवक मानसिंग राजपूत, माजी नगरसेवक प्रभाकर चौधरी ,नगरसेवक गणेश महाले, माजी जीप सदस्य भाऊसाहेब जाधव ,सामाजिक कार्यकर्ते नरेंद्र जैन,मल्हार सेना उत्तर महाराष्ट्र संपर्क प्रमुख गणेश जाणे, भरत गोरे, कैलास गावडे,अमित सुराणा ,शेषराव चव्हाण, रवी राजपूत आदी कार्यकर्ते उपस्थित होते,

नदी पात्र सुशोभीकरण शहराच्या सौंदर्यात भर घालेन… !!!

चाळीसगाव शहरातील तितूर नदी व डोंगरी नदी संगम व मस्तानी अम्मा टेकडी परिसराचे होणार सुशोभीकरण प्रस्तावात हा पूल साकारला जातो आहे. तत्कालीन आमदार तसेच विद्यमान खासदार उन्मेशदादा पाटील यांच्या प्रयत्नातून या परिसर विकासासाठी पर्यटन विभागातर्फे ४ कोटी ९२लाख मंजूर करण्यात आल्याने हे नदीपात्र येत्या काळात शहराच्या वैभवात भर घालणार आहे.

शहरवासीयांची उत्सुकता शिगेला

चाळीसगाव तालुक्याला ऐतिहासिक, आध्यात्मिक व निसर्ग सौदर्याचा वारसा असून तालुक्याला धुळे, नाशिक, औरंगाबाद हे जिल्हे लागून आहेत. त्यामुळे पर्यटकांची नेहमीच वर्दळ असते. चाळीसगाव शहरातील मध्य वस्तीतून एक तितूर नदी व डोंगरी नदीचा संगम आहे. त्याच परिसरात हिंदू मुस्लिम ऐक्याचे प्रतिक असणारा बामोशी बाबा दर्गा व मस्तानी अम्मा टेकडी दर्गा यांना जळगाव जिल्ह्यासह राज्यभरातील भाविक भेटीस येतात. शहराच्या मध्यभागातून जाणाऱ्या तितूर नदीमुळे शहराचे दोन भाग झाले असून मात्र आजतागायत या नदीचे संवर्धन व पर्यटनाच्या दृष्टीने या परिसराचा विकास न झाल्यामुळे नदीला कचराकुंडीचे स्वरूप प्राप्त झाले आहे.ही वस्तुस्थिती आहे.

त्यामुळे तितूर नदी व डोंगरी नदी तट परिसराच्या सभोवती नदी घाट, वनोद्यान, संरक्षण भिंत व मुलभूत सुविधा निर्माण करणे अत्यंत गरजेचे आहे व चाळीसगाव शहराच्या सौदर्य वर भर पडून येथे पर्यटकांची व भाविकांची ये-जा वाढून रोजगाराना चालना मिळेल ही बाब लक्षात घेत तत्कालीन आमदार तसेच विद्यमान खासदार उन्मेशदादा पाटील यांनी तेव्हाचे पर्यटन मंत्री नामदार जयकुमार रावल यांच्याकडे पाठविला होता. या परिसराच्या विकासाचा प्रस्ताव पाठविला होता. त्याला राज्य शासनाची मंजुरी दिल्याने पर्यटन विभागाच्या शासन निर्णयान्वये ४ कोटी ९२ लाख रुपये सदर कामासाठी मंजूर करण्यात आले होते. यात नदी घाट, वनोद्यान, संरक्षण भिंत, पथदिवे व मुलभूत सुविधा आदी कामे करण्यात येणार होती ती आज प्रगतीपथावर आहेत.या कामांतर्गत हा पूल साकारला जातो आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button