नॅशनलिस्ट कंजूमर प्रोटेकशन ऑर्गनिझशन ,जागो ग्राहक जागो,खुशाल भाऊ मिञ मंडळ च्या वतीने नगरपालिकेला निवेदन
चाळीसगाव मनोज भोसले
उपभोक्ता शुल्क कमी करणे बाबत,चाळीसगाव न पा वतीने न पा च्या कार्यक्षेत्रा तिल मालमत्ता धारका ना वर्ष 2019- 2020 चे कराचे देयक वाटप करण्यात आले व करण्यात येत आहे या देयक मध्ये आठव्या क्रमांक वर उपयोग कर्ता शुल्क म्हणून रु 360/-आकारण्यात आले आहे,सदर चे शुल्क ,हा काय प्रकार आहे,तो कोणत्या कारणा साठी आकारला जात आहे,याचा खुलासा हे पत्र मीळाल्या पासून ,सात दिवसाच्या आता न पा ने त्याचे उत्तर दयावे,तसेच शुल्क अनावश्यक आहे.या शुल्काची आकारणी कायदा व नियमाप्रमाणे करण्यात आली नाही म्हणून सदरचे शुल्क त्वरित रद्द करण्यात यावी ती मालमत्ता धारखं यांच्याकडून वसूल करण्यात येऊ नये.या उपरही आपण शुल्काची वसुली केल्यासआणि या कराच्या वसुलीसाठी मालमत्ता धारकास वेठीस धारल्यास सदर शुल्क रुद्ध करण्यासाठी नापा च्या विरोधात मोठे जन आंदोलन छेडण्यात येईल शिवाय सदर विषयाच्या अनुषंगाने कायदेशीर कारवाई करण्यात येईल याची नोंद घ्यावी. या कराच्या अनुषंगाने नपाच्या वतीने हे पत्र मिळाल्यापासून 7 दिवसाच्या आत खुलासा करण्यात यावा. दिलेल्या मुदतीत जर खुलासा देण्यात आला नाही तर नपा तर्फे बेकायदेशीर शुल्क आकारल्याबद्दल आंदोलन छेडलं जाईल व त्यातून होणाऱ्या सर्व प्रकारच्या परिणामास नपा प्रशासन जबाबदार राहील याची नोंद घाावी.
अश्या आशयाचे निवेदन नॅशनलिस्ट कंजूमर प्रोटेकशन ऑर्गनिझशन ,जागो ग्राहक जागो,खुशाल भाऊ मिञ मंडळ च्या वतीने नगरपालिकेला निवेदन देण्यात आले त्यावेळी खुशाल पाटील,विकास बागड व मित्रपरिवार उपस्थित होते,वरील प्रत रवाना करण्यात आली ती खलील प्रमाणे,तहसीलदार साहेब, पोलीस निरीक्षक साहेब,व जिल्हाअधिकारी ,






