फसव्या महाभकास तिघाडी सरकारच्या विरोधात रस्त्यावर आणि विधानसभेत संघर्ष करणार – आमदार मंगेश चव्हाणभारतीय जनता पक्षाच्या वतीने चाळीसगाव येथे धरणे आंदोलन
मनोज भोसले
चाळीसगाव – भाजपाचा विश्वासघात करुन काँग्रेस-राष्ट्रवादी बरोबर सत्ता स्थापन केलेल्या शिवसेनेने शेतकऱयांचा विश्वासघात केला आहे. सरकार स्थापन करीत असतांना शिवसेनेचे पक्षप्रमुखांनी आणि आताच्या मुख्यमंत्र्यांनी तसेच काँग्रेस, राष्ट्रवादीच्या प्रमुख नेत्यांनी शेतकऱयांच्या बांधावर जाऊन अवकाळीग्रस्तांना 25 हजार रुपये हेक्टरी आणि फळबागांसाठी 50 हजार रुपये हेक्टरी मदत देण्याची घोषणा केली होती. सरसकट कर्जमाफी करू, सातबारा कोरा करू अशा घोषणा करणाऱया महाविकास आघाडीच्या नेत्यांनी यापैकी एकही आश्वासन पाळलेले नाही. गेल्या महिन्याभरात राज्यातील महिलांवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे. हे सरकार सत्तेवर आल्यानंतर गुन्हेगारांना कायद्याचा धाक उरलेला नाही. हिंगणघाट येथील प्राध्यापिकेला जिवंत जाळण्याच्या घटनेने संपूर्ण देश हादरुन गेला आहे. 3 महिन्यात या सरकारला भाजपा सरकारच्या विकासकामांना स्थगिती देण्याशिवाय काही करता आले नाही, आज तालुक्यात कधी नव्हे इतके २२ पेक्षा जास्त ट्रान्सफोर्मर फेल असल्याने शेतकऱ्यांना त्यांच्या पिकांना पाणी देता येत नाही कारण काय तर ऑईल नाही साध शेतकऱ्यांना वीज देऊ न शकणारे हे तीन तिघाडे सरकार काय शेतकऱ्यांना कर्जमाफी देणार? चाळीसगाव तालुक्यातील MIDC मधील कत्तलखाना, चाळीसगाव – मालेगाव रस्ता दुरावस्था, नगरपालिका मुख्याधिकारी, शहरातील भूमिगत वीजतारा, खराब बसेस, कृषी विभागातील रिक्त पदे या अनेक ज्वलंत प्रश्नांबाबत मी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे मागणी केली असता त्यांनी तात्काळ कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या होत्या मात्र आज महिना उलटला तरी त्याबाबत कार्यवाही झाली नाही. मुख्यमंत्र्यांचा सुद्धा धाक शासन – प्रशासनाला राहिला नाही. म्हणून एक सक्षम विरोधी पक्ष म्हणून जनतेचे प्रश्न लावून धरण्याची जबाबदारी आपली असून पुढील काळात या निष्क्रिय सरकारला जागे करण्यासाठी मी विधानसभेबरोबरच रस्त्यावर उतरून आंदोलन करेन असा इशारा चाळीसगाव तालुक्याचे आमदार मंगेश चव्हाण यांनी दिला. भारतीय जनता पार्टीच्या वतीने चाळीसगाव तहसिल कार्यालयासमोर आमदार मंगेश चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली धरणे आंदोलन करण्यात आले, त्याप्रसंगी ते बोलत होते.यावेळी माजी केंद्रीय मंत्री एम.के.अण्णा पाटील, योगाचार्य वसंतराव चंदात्रे, प्रीतमदास रावलानी, नगराध्यक्षा आशालताताई चव्हाण, बाजार समिती सभापती सरदारशेठ राजपूत, संजय गांधी निराधार समिती तालुकाध्यक्ष के.बी.साळुंखे, पंचायत समिती गटनेते संजय भास्करराव पाटील, प्रदेश कार्यकारणी सदस्य उद्धवराव माळी, महिला आयोग सदस्या देवयानीताई ठाकरे, जिल्हा बँक संचालक राजेंद्र राठोड, भाजपा तालुकाध्यक्ष प्रा.सुनील निकम, शहराध्यक्ष घृष्णेश्वर पाटील, माजी मार्केट सभापती रविंद्र चुडामण पाटील, मच्छिंद्र राठोड, मार्केट सदस्य विश्वजित पाटील, कपिल पाटील, पं.स.सदस्य सुभाष पाटील, जेष्ठ नेते राजेंद्र चौधरी, प्रा.ए.ओ.पाटील, महिला मोर्चा शहराध्यक्षा संगीताताई गवळी, नगरसेविका विजयाताई पवार, नगरसेवक मानसिंग राजपूत, बापू अहिरे, चिराग शेख, माजी तालुकाध्यक्ष सुरेश सोनवणे, माजी सभापती दिनेश बोरसे, जेष्ठ पदाधिकारी अविनाश सूर्यवंशी, जिल्हा पदाधिकारी स्वप्नील मोरे, माजी नगरसेवक संजय घोडेस्वार, नमोताई राठोड, विश्वास चव्हाण, रमेश सोनवणे, डॉ.महेंद्र राठोड, कार्यालय मंत्री अरुण पाटील, राजेंद्र पगार, विवेक चौधरी, ग्रामीण तालुका उपाध्यक्ष – देविदास हरी बच्छे, दिनकर सीताराम पाटील, भैय्यासाहेब आनंदराव पाटील, सौ.अनिता सुदाम चव्हाण, यशवंतराव रंगराव सोनवणे, महेश फकीरराव शिंदे, गोविंद शिरुडे, ग्रामीण संघटन सरचिटणीस – धनंजय सुखदेव मांडोळे, गिरीश मधुकर बराटे, अमोल गोरख चव्हाण, शहर उपाध्यक्ष – अॅड प्रशांत शिवाजीराव पालवे, सोमसिंग देवसिंग राजपूत, सौ.विजयाताई भिकन पवार, सौ.कावेरीताई शांताराम पाटील, शहर सरचिटणीस – अमोल अशोक नानकर, जितेंद्र विनायक वाघ, योगेश श्रीनिवास खंडेलवाल, युवा मोर्चा तालुकाध्यक्ष सुनील मकराम पवार, महिला मोर्चा तालुकाध्यक्ष सौ.प्रभावती नगराज महाजन, युवा मोर्चा शहराध्यक्ष भावेश मुकुंद कोठावदे, ग्रामीण चिटणीस – कारभारी इरभान पवार,सौ मनीषा रात्नाकर पाटील, सौ वर्षा दिपकसिंग राजपूत, सौ जयश्री सुनील पवार,मनीषा शिवदास महाजन, अभिषेक प्रभाकर मोरे, शहर चिटणीस – सौ.सोनालीताई निलेश राजपूत, सौ.विद्याताई किशोर रणधीर, भरत पोपट गोरे, रणजीत सुरेश देशमुख, भास्कर पुंडलिक पाटील, सौ.शितलताई विजय जाधव, शहर कोषाध्यक्ष – किशोर गेणुजी गवळी प्रसिद्धी प्रमुख – विशाल अशोक कारडा, ग्रामीण कोषाध्यक्ष – निवृत्ती रामचंद्र कवडे, अपंग आघाडी तालुकाध्यक्ष बाबाजी लक्ष्मण सूर्यवंशी, उद्योग आघाडी तालुकाध्यक्ष रामेश्वर भीमराव कुमावत, व्यापारी आघाडी तालुकाध्यक्ष नितीन सुखदेव पाटील, प्रज्ञावंत आघाडी तालुकाध्यक्ष जगदीश भिकनराव सूर्यवंशी, वि.जा.भ.ज. आघाडी तालुकाध्यक्ष दिनकर धनसिंग राठोड, शिक्षक आघाडी तालुकाध्यक्ष विजय मुरलीधर कदम, वैद्यकीय आघाडी तालुकाध्यक्ष डॉ.रविंद्र तुळशीराम मराठे, कायदा आघाडी तालुकाध्यक्ष अॅड भागवत काशिनाथ पाटील, बारा बलुतेदार आघाडी तालुकाध्यक्ष तुषार पंडितराव सूर्यवंशी, अल्पसंख्यांक आघाडी तालुकाध्यक्ष अयाज खान अय्युब खान पठाण, कामगार आघाडी तालुकाध्यक्ष सुनील भीमराव माळी, किसान (शेतकरी) आघाडी तालुकाध्यक्ष विजय दिनकर पाटील, शिक्षक आघाडी शहराध्यक्ष मनोज सूर्यवंशी, अल्पसंख्यांक आघाडी शहराध्यक्ष शेख इमरान शेख, प्रज्ञावंत आघाडी शहराध्यक्ष राकेश भीमराव बोरसे, क्रीडा आघाडी शहराध्यक्ष धनंजय भिला मराठे, जेष्ठ नागरिक आघाडी शहराध्यक्ष दिलीप लक्ष्मण गवळी, वैद्यकीय आघाडी शहराध्यक्ष डॉ.महेश रमाकांत वाणी, अनुसूचित जाती शहराध्यक्ष सुबोध वाघमारे, उद्योग आघाडी शहराध्यक्ष संजय भगवान पाटील, व्यापार आघाडी शहराध्यक्ष जयवंत भिकनराव कोतकर, सांस्कृतिक आघाडी शहराध्यक्ष कवी रमेश पोतदार, कायदा आघाडी शहराध्यक्ष अॅड मनोज पितांबर वाघ, दिनेश चौधरी, सौरभ पाटील, गोपाळ चौधरी, आदी उपस्थित होते.यावेळी के.बी.साळुंखे, सुरेश सोनवणे, दिनेश बोरसे, संजय भास्करराव पाटील, प्रा.सुनील निकम, सौ.संगीता गवळी, भावेश कोठावदे, अमोल चव्हाण, भूषण पाटील, डॉ.महेंद्र राठोड, जितेंद्र वाघ, बापू अहिरे, चिराग शेख यांनी आपल्या मनोगतातून महाविकास आघाडी सरकारच्या कारभारावर आसूड उगारले, श्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील काळजीवाहू सरकारने अवकाळीग्रस्त शेतकऱयांना हेक्टरी 8 हजार रुपये एवढी मदत जाहीर केली होती. पुन्हा सत्तेत आल्यानंतर ही मदत आणखी वाढवू असेही आपल्या सरकारने जाहीर केले होते. या महाविकास आघाडी सरकारने अवकाळीग्रस्त शेतकऱयांना प्रति हेक्टरी आठ हजार पेक्षा एक रुपयाचीही अधिक मदत दिलेली नाही. महाआघाडी सरकारची कर्जमाफी योजनाही शेतकऱयाची सरसकट फसवणूक करणारी आहे. महाविकास आघाडी सरकारने शेतकऱयांची फक्त अल्प मुदतीची पीक कर्जे माफ केली आहेत. केवळ पीक कर्जाचा या कर्जमाफीत समावेश केल्याने बहुसंख्य शेतकऱयांना या कर्जमाफीचा फायदा मिळणार नाही. दोन लाखांवर कर्ज असलेल्या तसेच कर्जाची नियमित परतफेड करणाऱया शेतकऱयांबाबत महाविकास आघाडीच्या कर्जमाफी योजनेत कसलाच उल्लेख नाही. आपले सरकार असताना चाळीसगाव तालुक्यातील शेतकऱ्यांना बोंडअळी चे हेक्टरी १३५०० रुपये मिळाले, बोंडअळी चे ७० कोटी रुपये अनुदान फक्त आपल्या तालुक्याला मिळाले ज्यामुळे शेतकऱ्यांना दुष्काळाची तिव्रता जाणवली नाही मात्र या सरकारने शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडले असल्याची टीका त्यांनी केली.






