Nanded

माणूस माणसाला घडविण्याचे काम विसरत आहे डॉ.माधवराव किन्हाळकर

माणूस माणसाला घडविण्याचे काम विसरत आहे डॉ.माधवराव किन्हाळकर

नांदेड प्रतिनिधी वैभव घाटे

आज माणूस माणसाला घडवण्याचं काम विसरत आहे यासाठी गावातील वरिष्ठ मंडळींनी माणूस घडविण्यासाठी पुढाकार घेतला पाहिजे असे प्रतिपादन राज्याचे माजी गृह राज्यमंत्री डॉ. माधवराव किन्हाळकर यांनी केले. ते कुंडलवाडी येथील भूमिपुत्र, पहिले शल्य चिकित्सक, माझी नगराध्यक्ष डाॅ.एस .एस .शेंगुलवार हे पॅरिस (फ्रान्स ) येथे होणाऱ्या आंतरराष्ट्रीय शल्यचिकित्सक परिषदेमध्ये त्यांनी लिहिलेल्या थायराइड या प्रबंधावर व्याख्यान देण्यासाठी वक्ते म्हणून जात असल्याने आयोजित भव्य गौरव सोहळ्यात ते कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून बोलत होते. या भव्य गौरव सोहळा कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. माधवराव किन्हाळकर तर प्रमुख अतिथी म्हणून नांदेड येथील सुप्रसिद्ध प्रसूती शास्त्र तज्ञ डाॅ. सौ.चित्रा पाटील ,कुंडलवाडी प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. बी. एम. सातमवाड ,जि. प. सदस्य लक्ष्मण ठक्करवाड आणि सत्कारमूर्ती डॉ. एस .एस.शेंगुलवार हे उपस्थित होते. पुढे बोलताना किन्हाळकर म्हणाले की, डॉ.शेंगुलवार यांचा गौरव सोहळा पाहून असे वाटते की, आजही या गावातील लोकांकडे माणुसकी आणि कृतज्ञता जिवंत आहे. आज सगळीकडे माणसं दिसत आहेत पण त्यांच्यातील माणुसकी नष्ट झालेली आहे. खरं पाहिलं तर माणसाच्या माणुसकी मध्येच देव आहे. खऱ्या अर्थाने आपण सर्वजण जातीवादी, धर्मवादी ,पंतवादी नाही तर आपण मनीवादी(money) आहोत. राजकारणाला जेव्हा आपण धंदा म्हणून पाहतो तेव्हाच आपली माणुसकी नष्ट होऊन जाते असे सांगून लोकांना योग्य दिशेने घेऊन जाणारा यालाच खरा नेता म्हटला पाहिजे. लोकांची शक्ती जागृत केली पाहिजे.

संस्कार एका पिढीने दुसर्‍या पिढीला हस्तांतरण केले पाहिजे. भ्रष्टाचार, गद्दारी ,व्यक्तिपूजा या तिन्ही गोष्टी ने आज आपला देश थैमान झालेला आहे. या तिन्ही गोष्टी आपल्या देशात भविष्याला धोका निर्माण करणारे आहेत…..याप्रसंगी सत्काराला उत्तर देताना डॉ.शेंगुलवार म्हणाले की माझ्या गावकऱ्यांनी आयोजित केलेला हा माझा गौरव सोहळा माझ्या संपूर्ण आयुष्यात आठवण ठेवीन. यापूर्वी मी या नगरीचा नगराध्यक्ष असताना आपण भरपूर विकासाची कामे केली त्या वेळी कधी आपला एवढा गौरव पाहायला मिळाला नाही. माझे आई-वडील असुशिक्षित असल्याने त्यांचा माझ्या शिक्षणाला खूप विरोध होता .त्या काळात मी खूप संघर्षमय जीवनात माझ्या स्वतःच्या इच्छेने शिक्षण पूणॅ केले. मेहनत आणि जिद्द या दोन्ही सवयी माझ्याकडे असल्याने आज मी एक यशस्वी डॉक्टर झालो. स्वतःच्या बुद्धीवर व कर्तुत्वावर मी माझे वैद्यकीय शिक्षणही पूर्ण केले .त्यानंतर काही काळाने अचानक राजकारणामध्ये येण्याची इच्छा निर्माण झाली आणि या नगरीचा मी थेट लोकांमधून नगराध्यक्ष म्हणून निवडून आलो आणि माझ्या परीने मी या गावचा भरपूर विकास करण्याचाही प्रयत्न केला आणि हदवाढ आणि होम टॅक्स हे दोन महत्त्वाची कामे मी माझ्या कार्यकाळात केल्याने मला सार्थ अभिमानही आहे.

याप्रसंगी डॉ. चित्रा पाटील, शेख बाशीद, मोहन गंगोने, प्रकाश अर्जूने , सौ.मंजूषा दाचावार,प्रा.आनंद इनामदार,लक्ष्मण ठक्करवाड, गणेश कत्रुवार, डॉ.बी.एम.सातमवाड यांचीही भाषणे झाली. या गौरव सोहळा वतीने डॉ.शेंगुलवार यांचे औषधी ने तुला करून सदर औषधी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात भेट म्हणून दिल्या. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. डॉ.गोपाळ चौधरी यांनी केले तर उपस्थितांचे आभार शेख बाशीद यांनी मानले.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button