Nanded

प्रजापिता ब्रम्हाकुमारी ईश्वरीय विश्व विद्यालय व जिल्हा तंबाकू नियंत्रन कक्षा मार्फत तंबाकू नियंत्रन कार्यक्रम सम्पन

प्रजापिता ब्रम्हाकुमारी ईश्वरीय विश्व विद्यालय व जिल्हा तंबाकू नियंत्रन कक्षा मार्फत तंबाकू नियंत्रन कार्यक्रम सम्पन

नांदेड प्रतिनिधी वैभव घाटे

जिल्हा तंबाकू नियंत्रन कक्ष नांदेड व प्रजापिता ब्रम्हाकुमारी ईश्वरीय विश्व विद्यालय चे सहभागींनी संस्था राजयोग एजुकेशन अंड रीसर्च फाऊनडेशन मेडिकल विंग मार्फत बिलोली येथील विद्यानिकेतन मुलींचे हायस्कूल व प्राथमिक शाळा, यश्वंतराव चव्हाण हायस्कूल बिलोली या तंबाखू विषयी कार्यक्रम सम्पण झाला. तंबाखू मुळे होणारे दुस्परीनाम बद्दल सविस्तर माहिती देण्यात आली भारतात प्रती दिवशी ३५०० पेक्षा जास्त लोकांचा मृत्य होत असतो. प्रत्येक ६ सेकंदात एका व्यक्ती चा मृत्यू होत आहे, एक सिगरेट पिल्याने जीवनातले ११ मिनिटे कमी होत असते व तसेच तंबाकू अधिनियम २००३ विषयी माहिती दिली. सार्वजनिक ठिकाणी सिगारेट पिने कायद्याने गुन्हा आहे. १००००रुपया पर्येत दंड होऊ शकतो. त्याच बरोबर तंबाकू या व्यसनापासून दूर कसे राहाचे या बद्दल सविस्तर माहिती देण्यात आली.नियमित व्यायाम केल्याने. डॉक्टर च्या सल्याने, राजयोग ध्यान केल्याने. आत्म्यात सात गुणाचा संचार होत असतो आज ज्या गोष्टी ची कमी आहे ते मंजे सुख, शांती, आनंद, प्रेम, पवित्रता, ज्ञान, आणि शक्ती, ची जर आपण राजयोग ध्यान करतो तेव्हा आपल्यात या सर्व गुणांचा संचार होत असतो. मग मनुष्य कर्मेंद्रिय चा सुख ऐवजी आत्मिक सुख आणि शांती चा विचार करतो. भारताचा प्राचीन राजयोग जो सर्व मनुष्याला सुखा कडे घेऊन जात असतो. यात बी के योगेंद्र यांनी व्याख्यान केले. तर बिलोली उपसेवाकेंद्र प्रमुख बी के महानंदा बहेनजी यांनी तम्बाकू पासून दूर राहण्याची विध्यार्थाना शपत घातली. नांदेड जिल्यातील मुख्य बी के शिवकन्या बहेनजी यांचा मार्गदर्शना खाली हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यात शाळेतील मुख्याध्यापक, शिक्षक, व संपूर्ण स्टाफ यांनी मोलाचे सहकार्य केले.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button