आद्य क्रांतीविर नोवसाजी नाईक व त्यांचे सहकारी स्वातंत्र्य योद्धे ह्यांच्या स्मृती सोहळ्याचे आयोजन.
दत्ता पारेकर
मराठवाडा व विदर्भाच्या भूमीमध्ये नाव्हा, ता हदगाव, जि नांदेड येथे इंग्रज व निझामाच्या सैन्यासोबत दि ८ जानेवारी १८१८ ते ३१ जानेवारी १८१९ या कालखंडात आध्यक्रांतीविर नोवसाजी नाईक व त्यांच्या साथीदारांनी केलेल्या स्वातंत्र्याच्या पहिल्या लढाईत वीरमरण आलेल्या शूरवीर योध्यांना आदरपूर्वक अभिवादन करण्याकरिता हा स्मृती सोहळा आयोजित करण्यात आला आहे.

दिनांक ३१ जानेवारी २०२० ला ह्या लढण्यास २०१ वर्षे पूर्ण होतात,याचे औचित्य साधून शुक्रवार दिनांक ३१जानेवारी २०२० ला दुपारी १२ वाजता श्रीक्षेत्र खंडोबा देवस्थान सभागृह धनसळ,ता पुसद, जि यवतमाळ येथे स्मृती सोगळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाचे अध्यक्ष श्रीमंत भूषणसिंहराजे होळकर (वंशज होळकर राजघराणे इंदौर) हे भूषवणार आहेत, या प्रसंगी प्रमुख वक्ते म्हणून प्रा संतोष पिंगळे सर बारामती (लेखक सरंजामी मरहट्टे), सुमितराव लोखंडे ठाणे (इतिहास अभ्यासक), प्रशांत लवटे पाटील पुणे (लेखक व व्याख्याते), प्रा यशपाल भिंगे सर नांदेड (व्याख्याते), तसेच माजी आमदार रामराव वडकूते, भाजप प्रवक्ते गणेशदादा हाके पाटील,बाळासाहेब दोडतले (अध्यक्ष-महाराष्ट्र शेळी मेंढी महामंडळ) यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.
या स्मृती सोहळ्याचे आयोजन श्री प्रवीण नाईक (अध्यक्ष,श्रीक्षेत्र खंडोबा देवस्थान धनसळ ) श्री आनंदराव नाईक (इसापूर) व क्रांतिवीर स्मृती सोहळा समिती पुसद ह्यांच्या तर्फे करण्यात आले आहे.






